देगाव (जि. नांदेड) : नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून फिर्यादी महिलेच्या पतीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. ही घटना २९ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
बेंद्री येथील संतोष माधवराव बेंद्रीकर हा आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहितेवर सतत वाईट नजर ठेवून होता. २२ डिसेंबर रोजी त्याने या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेने नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संतोष विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांत मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून महिलेच्या पतीला एकटे गाठून पेट्रोल टाकत पेटवून दिले. यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. गावातील वातावरण तणावपूर्ण असल्याने त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय तोटवाड हे करीत आहेत.
जामीन मिळाला आणि वाद विकोपाला गेलागुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या संतोषला नायगाव पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी नरसी येथून ताब्यात घेतले. मात्र, न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी फिर्यादी पक्षावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. "आमच्यावर गुन्हा का दाखल केला, तो मिटवून का घेतला नाही?" असा जाब विचारत वादाला तोंड फुटले. दरम्यान, २९ डिसेंबर रोजी सकाळी ५:३० च्या सुमारास फिर्यादीचे पती हे म्हशीला वैरण टाकण्यासाठी घराशेजारील पत्राच्या शेडमध्ये गेले होते. यावेळी आरोपी संतोष बेंद्रीकर, त्याचे वडील माधव विश्वनाथ बेंद्रीकर आणि भाऊ शिवकुमार माधव बेंद्रीकर यांनी तिथे येऊन वाद घातला. तसेच महिलेच्या पतीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत नायगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना नांदेडला हलविले आहे.
Web Summary : In Nanded, a molestation accused, out on bail, allegedly set the victim's husband on fire following a dispute. The victim's husband is critically injured. Police arrested three, including the main accused. Tensions are high in Bendri village.
Web Summary : नांदेड में छेड़छाड़ के एक आरोपी ने जमानत पर छूटने के बाद कथित तौर पर पीड़िता के पति को विवाद के बाद आग लगा दी। पीड़िता के पति गंभीर रूप से घायल हैं। पुलिस ने मुख्य आरोपी सहित तीन लोगों को गिरफ्तार किया। बेंद्री गांव में तनाव है।