शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
5
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
6
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
7
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
8
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
9
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
10
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
11
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
12
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
13
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
14
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
15
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
16
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
17
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
18
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
19
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
20
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

प्लॅटफॉर्मवरून ट्रॅक्टर थेट रुळावर कोसळला; मुदखेड रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:23 IST

मुदखेड रेल्वे स्थानकात थरार; प्रशासनाने प्रसंगावधान राखलं, मोठा अनर्थ टळला

- सचिन मोहितेमुदखेड ( नांदेड): येथील रेल्वे स्थानकावर आज (गुरुवार) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी साहित्य वाहून नेणारा ट्रॅक्टर अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून अनियंत्रित होऊन थेट रेल्वे रुळावर कोसळला. सुदैवाने रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखून त्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या रेल्वेगाड्या इतर प्लॅटफॉर्मकडे वळविल्याने मोठा अनर्थ टळला.

सध्या मुदखेड रेल्वे स्थानकावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक साहित्य ट्रॅक्टरद्वारे नियमितपणे ने-आण केले जाते. आज सकाळच्या सुमारास एक ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर साहित्य टाकून परत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट रुळावर कोसळला. या घटनेने संपूर्ण स्थानक परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ट्रॅक्टर कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने कारवाई करत प्लॅटफॉर्म १ वर येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे परिस्थिती आटोक्यात आली. रेल्वे प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, भविष्यात अशा घटना टळाव्यात यासाठी सुरक्षा उपाय अधिक कडक केले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातrailwayरेल्वे