धक्कादायक ! किरकोळ वादातून नांदेडात पत्नीने केला पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 15:16 IST2018-02-24T15:15:48+5:302018-02-24T15:16:39+5:30
नागसेननगर भागात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना आज दुपारी एकाच्या सुमारास उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

धक्कादायक ! किरकोळ वादातून नांदेडात पत्नीने केला पतीचा खून
नांदेड : नागसेननगर भागात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना आज दुपारी एकाच्या सुमारास उघडकीस आली. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागसेननगर परिसरात शाम उर्फ शिवाजी नारायण सरपे हे पत्नी पूनम सोबत राहतात. आज दुपारी सरपे पती-पत्नीत काही कारणांवरून वाद झाला. यावेळी शाम आणि पूनम यांच्यात झटापट झाली. यात शाम याच्या छातीत चाकूचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पूनमला ताब्यात घेतले असून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.
मी वाचविण्याचा प्रयत्न केला
आमच्यात वाद झाल्यानंतर शाम स्वतःस चाकू मारून घेत होते, तेव्हा आपण त्यांना वाचविण्यासाठी चाकू पकडल्याला असे पूनमने पोलिसांना यावेळी सांगितले आहे. दरम्यान, पूनम दोन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.