शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

धक्कादायक ! किनवटमध्ये त्याच शेतात आणखी एका बिबट्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:02 PM

तीन दिवसांपूर्वीही सापडला होता मृत बिबट्या

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी शेतात विषप्रयोगाचा अंदाज

किनवट (जि. नांदेड) : तालुक्यातील तल्लारी-झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्याच शेतात शनिवारी आणखी एका बिबट्याचा मृतदेह आढळल्यान खळबळ उडाली आहे. वनविकास महामंडळाच्या अधिका-यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत शवविच्छेदन केले. अधिका-यांनी विषप्रयोगाचा अंदाज व्यक्त केला असला तरी, बिबट्याच्यामृत्यूचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तीन दिवसांपूर्वी याच शेताच बिबट्याचा मृतदेह आढळला होता.  

किनवट तालुक्यातील तल्लारी व झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्या शेतात १५ एप्रिल रोजी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. किनवट वनविकास महामंडळाच्या अधिका-यांनी त्याचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून अंत्यविधी केला होता. या घटनेला तीन दिवस उलटले नाहीत तोच शनिवारी आणखी एका बिबट्याचा मृतदेह त्याच शेतात आढळला. प्रथम मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या ठिकाणापासून पन्नास फूट अंतरावर या दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत या घटनेची माहिती तातडीने नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांना दिली. त्यानंतर ठाकरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर  पशुधन विकास अधिकारी डॉ व्ही.एल. बिराजदार, डॉ़ अजय शिवणकर, डॉ़ ओमप्रकाश शिंदे, एस़ एऩ मिराशे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.

कुत्र्याचाही मृतदेहया बिबट्यावर विषप्रयोग केला असावा, अशी शंका वर्तवली जात असून, परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन  तपास करण्याच्या सूचना  उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी  वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस. एच. वाजे व वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. गीते यांना दिल्या. मृत बिबट्यापासून काही अंतरावर एका कुत्र्याचाही मृतदेह आढळून आला आहे़ त्याचाही नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ व्ही.एल. बिराजदार यांनी सांगितले.तीन महिन्यांपूर्वीही दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते. किनवट वनविकास महामंडळाच्या जंगलात कमठाला व सिरमेटी शिवारात तीन महिन्यांपूर्वी दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे वनविकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या या जंगलात शिकार करणारी टोळी तर नाही ना, असा प्रश्नही उपस्थित जात आहे.

दात-नखे जागेवरचवनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. गीते यांनी मृत बिबट्याचे दात, नखे तसेच इतर अवयव घटनास्थळी ‘जैसे थे’ आढळून आल्याचे सांगितले.  

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूNandedनांदेडforest departmentवनविभाग