एसटी विभागीय कार्यालयात शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST2021-02-22T04:12:38+5:302021-02-22T04:12:38+5:30
सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नंदू ...

एसटी विभागीय कार्यालयात शिवजयंती साजरी
सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नंदू पाटील बेंद्रीकर, सखाराम सूर्यवंशी, गुणवंत एच. मिसलवाड, सिद्धार्थ जोंधळे, विनोद पांचाळ, अशोक वाघमारे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
आ. बालाजी कल्याणकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व विचार आत्मसात करण्याची काळाची गरज आहे. एसटी कर्मचार्यांचे प्रश्न परिवहन मंत्र्यांपर्यंत मांडले असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक नंदू पाटील बेंद्रीकर यांनी केले. सूत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. यशस्वीतेसाठी मन्मथ स्वामी, गहिरवार-ठाकूर, जाधव, टोणगे, गोविंद हाळे, बाळू चौधरी, बाबूराव गर्जे, संतोष सूर्यवंशी, आम्रपाली शेळकीकर, गीतांजली सावे, भूमिका गटलेवार, अनिता शिंदे, गीतांजली सावळे, संतोष भालेराव, लक्ष्मण कपाळे, संजय गावडे, अभिजित ताकझुरे आदींनी परिश्रम घेतले.