शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
3
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
4
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
5
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
7
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
8
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
9
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
10
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
11
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
12
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
13
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
14
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
15
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
16
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
17
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
18
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
19
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
20
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये शिंदेसेनेला धक्का; ऐनवेळी दोघांची माघार, आमदार कल्याणकर भाजपवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:53 IST

महापालिका रणधुमाळी : ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात; ३७६ जणांची माघार, अपक्षांना शनिवारी चिन्ह

नांदेड : महापालिका निवडणुकीत उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली घडल्या. शिंदेसेनेच्या दोन अधिकृत उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. भाजपकडून सेनेला हा धक्का असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी त्या उमेदवारांच्या जागी नव्या उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले. तर यावरून संताप व्यक्त करत कल्याणकर यांनी भाजपने उमेदवार पळवल्याचा आरोप केला. आता ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

शुक्रवारी उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी शहरात राजकीय नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक ५ अ मधील शिंदेसेनेचे उमेदवार महेंद्र पिंपळे आणि प्रभाग क्रमांक १० ब मधील वंदना मनोज जाधव यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे, महेंद्र पिंपळे हे काही दिवसांपूर्वीच भाजपमधून सेनेत दाखल झाले होते. सेनेचा एबी फॉर्म मिळवत उमेदवारी मिळविली अन् पुन्हा माघार घेत भाजपमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, शिंदेसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ अ साठी मिनाक्षी रमेशराव धनजकर आणि प्रभाग क्रमांक १० ब साठी दिपाली हिरामन थोरवट यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. 

प्रभागांतील ८१ जागांसाठी तब्बल १२०३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. छाननी प्रक्रियेत ५९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर ८७८ इच्छुकांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १ आणि २ जानेवारी असे दोन दिवस निश्चितकेले होते. या कालावधीत एकूण ३७६ उमेदवारांनी माघार घेतली असून आता निवडणूक रिंगणात ४९१ उमेदवार उरले आहेत.

अपक्षांची 'दिवाळी'या निवडणुकीत मोठ्या संख्येने अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतविभाजन टाळण्यासाठी या अपक्षांची मनधरणी करताना नाकीनऊ आले असले तरी या मंडळींची मात्र दिवाळी झाल्याची चर्चा होती.

नाट्यमय घडामोडीनंतर बंडोबा झाले थंड; अनेकांची माघारअनुकूल उमेदवार निवडणुकीत टिकवून ठेवण्यासाठी आणि अडचणीचे उमेदवार माघार घेतील यासाठी नेत्यांना कसरत करावी लागली. या प्रक्रियेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. मात्र पक्षाकडून समजूत काढल्यानंतर या बंडखोरांनी 'विकासासाठी' माघार घेत असल्याचे सांगत उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अनेक प्रभागांतील चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी थेट लढती तर काही ठिकाणी बहुरंगी सामना रंगणार आहे.

बंडखोरांना थंड करण्यासाठी आश्वासनांची खैरातपक्षाकडून तिकिट न मिळाल्यामुळे अनेकांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. गेल्या दोन दिवसात या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीनेत्यांनी वेगवेगळी आश्वासने दिली. त्यात काहींना पक्षात पदेही देण्यात आली. अॅड. दिलीप ठाकूर आणि त्यांच्या पत्नीन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या शिफारशीवरुन ठाकूर यांना महानगर जिल्हा सरचिटणीस पद देण्यात आले. त्यामुळे ठाकूर दांम्पत्याने उमेदवारी मागे घेतली. तर काही जणांना पक्षात मानाचे स्थान देण्यात येईल. तसेच भविष्यात विचार करण्यात येईल, असे आश्वासन देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले.

प्रभागनिहाय माघारी घेतलेले उमेदवारप्रभाग १- २२, प्रभाग २- १४, प्रभाग ३- २२, प्रभाग ४- १९, प्रभाग ५- ४०प्रभाग ६- २४, प्रभाग ७- १७, प्रभाग ८- ३५, प्रभाग ९- ६३, प्रभाग १०- १७प्रभाग ११- ०६, प्रभाग १२- ०४, प्रभाग १३- १३, प्रभाग १४- १९, प्रभाग १५- २८प्रभाग १६- २१, प्रभाग १७- १२, प्रभाग १८- १३, प्रभाग १९- १७, प्रभाग २०- ३६

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for Shinde Sena in Nanded; Two Withdraw, MLA Angry

Web Summary : Two Shinde Sena candidates withdrew from Nanded municipal elections. MLA Kalyanakar replaced them and accused BJP of poaching candidates, leaving 491 in the race.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना