हिलालनगरात सव्वा क्विंटल गोमांस जप्त, खाटिकाला केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:30 IST2019-03-07T00:30:42+5:302019-03-07T00:30:56+5:30
नांदेड ग्रामीण पालीस ठाण्याच्या हद्दीत हिलालनगर येथे पोलिसांनी एका घरावर छापा मारुन तब्बल सव्वा क्विंटल गोमांस जप्त केले आहे़ याप्रकरणी गोमांस बाळगणाऱ्या खाटिकालाही अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला़

हिलालनगरात सव्वा क्विंटल गोमांस जप्त, खाटिकाला केली अटक
नांदेड : नांदेड ग्रामीण पालीस ठाण्याच्या हद्दीत हिलालनगर येथे पोलिसांनी एका घरावर छापा मारुन तब्बल सव्वा क्विंटल गोमांस जप्त केले आहे़ याप्रकरणी गोमांस बाळगणाऱ्या खाटिकालाही अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला़
पोउपनि गजानन मोरे हे पोहेकॉ़ मोकले, पोना सूर्यवंशी, पांचाळ, ढगे यांच्यासह ६ मार्च रोजी पेट्रोलिंग करीत होते़ त्यावेळी पोउपनि मोरे यांना हिलालनगर येथील खालेद खाटीक सुलतान खाटीक यांच्या घराच्या कंम्पाऊंडमध्ये बंदी असलेले गोमांस असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली़ त्यानंतर मोरे यांनी गोमांस असल्याची खात्री करुन घेतली़ त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हिलालनगर येथे धाड मारली़ यावेळी खालेद खाटीक सुलतान खाटीक हा घराच्या कंम्पाऊंडमध्ये गोवशांचे मांस कापत असल्याचे आढळून आले़ पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले़ यावेळी घटनास्थळावरुन १२० किलो बैलाचे मांस जप्त करण्यात आले़ तसेच गोवंश कापण्यासाठी असलेली सुरी, कुºहाडही ताब्यात घेतली़ याप्रकरणी पोउपनि मोरे यांच्या तक्रारीवरुन खालेद खाटीक सुलतान खाटीक यांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़