शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी ‘संयुक्त पथके स्थापन करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:09 AM

विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याची सूचना महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून प्राप्त झालेले पाणी जुलैपर्यंत राखून ठेवण्याची मोठी कसरत महापालिकेला करावी लागणार आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प उरल्यानंतर महापालिकेने लोअर दुधना प्रकल्पातून तब्बल १६६ कि.मी. अंतराहून पाणी घेतले. २५ दलघमी पैकी महापालिकेला अपेक्षित १५ दलघमी पाणी शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत विष्णूपुरीत पोहोचले होते. दुपारनंतर पाण्याचा येवा मंदावला. परिणामी आता उपलब्ध झालेल्या पाण्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.आयुक्त माळी यांनी पाणीपुरवठा विभागाला विष्णूपुरीतील पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके स्थापन करण्याची सूचना केली आहे. या पथकाद्वारे विष्णूपुरीतील पाणी चोरी रोखण्यात येणार आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कळवले आहे. आता जिल्हाधिकारी सदर पथक स्थापनेचे आदेश निर्गमित करतील. या पथकात महसूल, सिंचन, पोलीस, महावितरण तसेच महापालिकेच्या कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या पाणी उपसा सुरू आहे. हजारो विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणीपुरवठा उपसा २४ तास सुरू आहे. त्यामुळे मोठ्या परिश्रमातून घेतलेले पाणी जुलैपर्यंत राहील की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या संयुक्त पथक स्थापनेची गरज निर्माण झाली होती.संयुक्त पथकालाही प्रत्यक्ष प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या पाण्याची चोरी न रोखल्यास आणि पावसाळा लांबल्यास पाण्याचा मोठा प्रश्न शहरापुढे उद्भवणार आहे. हीच बाब लक्षात घेवून मनपाने पावले उचलली आहेत.---पाणीपुरवठ्यात महावितरणचा खोडाशहरात अनियमित पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठी ओरड सुरू आहे. महापालिकेच्या १६ मे रोजी झालेल्या सभेतही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याबाबत आयुक्तांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तात्काळ नगरसेवकांना पुरवले. मात्र या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात महावितरणचा मोठा अडथळा महापालिकेला सहन करावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील जलकुंभ भरण्यात विलंब होत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडत आहे. याबाबत महापालिकेने महावितरणला कळवले आहे.

 

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई