सलग दुसऱ्या वर्षीही बुडाली बँडवाल्यांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:50+5:302021-05-27T04:19:50+5:30
चौकट-१. कोरोनामुळे यंदाही लग्न सोहळे होऊ शकले नाहीत. मागील वर्षी कोरोनामुळे सिझन गेल्यानंतर यंदा तरी मागील वर्षीचे नुकसान भरून ...

सलग दुसऱ्या वर्षीही बुडाली बँडवाल्यांची कमाई
चौकट-१. कोरोनामुळे यंदाही लग्न सोहळे होऊ शकले नाहीत. मागील वर्षी कोरोनामुळे सिझन गेल्यानंतर यंदा तरी मागील वर्षीचे नुकसान भरून निघेल असे वाटत होते. मात्र, आता आमचे जीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता दिसत नाही. कारण पुढील वर्षी कोणते संकट येईल, हे सांगता येत नाही. आम्ही जगायचे कसे हा प्रश्न पडला आहे.- बबनराव जोगदंड, बँड कलावंत.
२.-दिवाळीनंतर जुळलेल्या लग्न सोहळ्यांच्या तारखा मार्च, एप्रिल, मे महिन्यांत काढण्यात आल्या होत्या. आमच्या तारखा बुक झाल्या होत्या. त्यामुळे यंदाचा सिझन आमच्यासाठी महत्त्वाचा होता. मात्र, ऐन लग्नसराईतच कोरोनाचे संकट आले. गेल्या तीन महिन्यांपासून घरातच बसून आहोत. - बालाजी कांबळे, बँड कलावंत.
३.- दीड वर्षापासून शहरात किरायाने घेतलेल्या दुकानाचा किराया देता आले नाही. त्यामुळे दुकान बंद केली आहेत. दोन्ही वर्षी ऐन लग्नसराईतच कोरोना आल्यामुळे आमचे जगणे अवघड झाले आहे. घेतलेल्या सुपाऱ्या परत कराव्या लागल्या आहेत. आता वर्षभर काय खावे, असा प्रश्न आमच्या समोर पडला आहे. - मारूती बुरडे. बँड कलावंत.