लसीकरण मोहिमेत आजही दुसऱ्या डोसलाच प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST2021-06-17T04:13:46+5:302021-06-17T04:13:46+5:30

मनपा क्षेत्रातील श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना, हैदरबाग, ...

The second dose is still preferred in the vaccination campaign | लसीकरण मोहिमेत आजही दुसऱ्या डोसलाच प्राधान्य

लसीकरण मोहिमेत आजही दुसऱ्या डोसलाच प्राधान्य

मनपा क्षेत्रातील श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या १० केंद्रांवर कोविशील्डचा ४५ वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.

याव्यतिरिक्त कोव्हॅक्सिन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरू गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको अशा एकूण ११ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस याप्रमाणे उपलब्ध करून दिली आहेत. या ठिकाणी १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

शहरी भागात मोडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय, देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय, भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १६ केंद्रांवर कोविशील्डची ही लस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय, देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय, भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकूण १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी १५० डोस उपलब्ध करून दिले आहे. हे डोस १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशिल्ड ही लस उपलध करून देण्यात आली असून, याठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोस दिला जाईल. या सर्व ६७ केंद्रांवर प्रत्येकी १०० याप्रमाणे डोस उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात १५ जूनपर्यंत एकूण ४ लाख ६८ हजार ८५९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले; तर १६ जूनपर्यंत कोविशिल्डचे ४ लाख ३८ हजार २३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ४१ हजार ९४० डोस याप्रमाणे एकूण ५ लाख ८० हजार १७० डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत, तर कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरिता ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

Web Title: The second dose is still preferred in the vaccination campaign