शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"जागा वाटप अजून सुरू झाले नाही, याबाबत लवकरच बैठक घेऊ", नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

By शिवराज बिचेवार | Updated: August 11, 2024 13:40 IST

"महाभ्रष्ट आणि मतिमंद सरकार आम्हाला घालवायचा, हा आमचा एकच उद्देश आहे."

शिवराज बीच्चेवार/

नांदेड- "जागा वाटपाची सुरुवात अजून झालेली नाही. महाविकास आघाडीचे सगळे नेते सध्या दौऱ्यावर आहेत. 16 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा आहे, त्यावेळी आम्ही जागा वाटपाच्या संदर्भातल्या बैठकीची तारीख निश्चित करू. मिरच्या आधारावर जागावाटप होईल. आमचा एकच उद्देश, महा भ्रष्ट आणि मतिमंद सरकार आम्हाला घालवायचा आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.

राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यादरम्यान जे घडलं त्यामागे उद्धव ठाकरे शरद पवार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. या आरोपावर नाना पटेल यांनी मात्र कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, "राज्यात कायदा सुव्यवस्था आणि नीतिमत्ता राहिली नाही. राज्यातले सरकार खोक्याचे सरकार आहे, बेईमान सरकार आहे, गुजरात धार्जिन सरकार आहे. सरकारमुळे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. एखाद्या पक्षाच्या नेत्यावर कसा हमला केला जातो, हे आपण पाहिलेला आहे आणि तो पण ठाण्यामध्ये जिथे राज्याचे मुख्यमंत्री राहतात. ठाणे जिल्ह्यात अशी कृती होत असेल, तर ती अशोभनीय आहे. कुणी त्या कृतीचा समर्थन करू शकत नाही", असेही नाना पटोले म्हणाले. 

नांदेडमधील देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर सध्या भाजप नेत्यांसोबत संपर्कात आहेत. याबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले, "राज्यसभा विधानसभेत ज्यांनी क्रॉस वोटिंग केली, त्यांची नावे आपल्याला तिकीट वाटपात कळतील. कोणालाही जबरदस्ती नाही, काँग्रेसमुळे ते आमदार झालेत , काँग्रेस विरोधात जायचे असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देगलूरमध्ये लोक काँग्रेसच्या विचाराचे आहेत. कारवाई बाबत निर्णय ठरलेले आहेत, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल," अशी प्रतिक्रिया नाना पटेल यांनी दिली.

तसेच, "परमजीत सिंग अधिकारी आहे, त्यांना भगोडा  जाहीर केले होते. चांदीवली आयोगाच्या समक्ष त्यांनी जे आरोप लावले होते ते सर्व आरोप त्यांनी परत घेतले होते. चांदीवली आयोगासमोर परमबीर सिंग बोलू शकले नाही, आता सरकारी पक्षाचे पोपट झाले आहेत. सरकार मूळ प्रश्नाकडे लक्ष देत नाही, परमबीर सिंग पोपट बनत असेल त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका", असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा