शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

किनवटमध्ये मातीच्या ढिगाऱ्यावर भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:36 IST

निजामकालीन जिल्हा परिषद मुलींची हायस्कूल व उर्दू शाळा नगर परिषदेने पर्यायी व्यवस्था न करता पाडून मराठी व उर्दू माध्यमाच्या ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा प्रकार किनवटमध्ये घडला.

ठळक मुद्देनिजामकालीन इमारत पालिकेने पाडली पर्यायी व्यवस्था न झाल्याने सतत होते विद्यार्थ्यांची गैरसोय

किनवट : निजामकालीन जिल्हा परिषद मुलींची हायस्कूल व उर्दू शाळा नगर परिषदेने पर्यायी व्यवस्था न करता पाडून मराठी व उर्दू माध्यमाच्या ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा प्रकार किनवटमध्ये घडला. पालिकेने नेस्तनाबूत केलेल्या जुन्या इमारतीच्या ढिगा-यावर पहिल्याच दिवशी शाळा भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली.किनवटच्या मध्यवर्ती भागात निजामकालीन जिल्हा परिषदेची माध्यमिक कन्या शाळा व उर्दू शाळा होती. उर्दू माध्यमांचे पहिली ते चौथी चे २६ तर मराठी माध्यमाचे पहिली ते सातवीचे ४९ असे ७५ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. यापूर्वी नगर परिषद किनवटने उर्दू व मराठी माध्यमाच्या दोन इमारती पाडून त्या इमारतीच्या समोरच्या भागात नगर परिषद किनवटची नवीन इमारत बांधण्यात आली. ३ जून रोजी दस्तऐवज व शैक्षणिक साहित्य न हलवता इमारत पाडण्यात आली.या दरम्यान, संबंधितांनी विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे १७ जून रोजी शैक्षणिक सत्राला आरंभ होताच विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली.शाळेची इमारत पाडलेली असल्याने आता जावे कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. शेवटी शाळेच्या ढिगाºयावर वर्ग भरविण्यात आले तर नगरपालिका नव्या इमारतीच्या पाय-यावर राष्ट्रगीत व प्रार्थना विद्यार्थ्यांनी घेतली.वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत शाळा तेथेच भरेलशाळेची इमारत पाडण्यात आल्याने शालेय अभिलेखे, कपाट, रापटर, अन्य साहित्य असे १ कोटी ३५ लाखांचे नुकसान झाले. तसे पत्र पालिका मुख्याधिकारी यांना दिले आहे. उलट आम्हालाच पालिकेने एक पत्र दिले. इमारत आमची जागा आमची. याला तुम्ही जबाबदार आहात असे त्यात नमूद करण्यात आले. सदर पत्र शिक्षणाधिकारी यांना पाठवून शाळा स्थलांतराची परवानगी द्यावी, असे नमूद केले आहे. पालिकेने कोणती पर्यायी व्यवस्था केली, ती जागा दाखविण्यात आली नाही. वरिष्ठांचे आदेश जोपर्यंत येणार नाहीत, तोपर्यंत शाळा तेथेचे भरेल. मला शाळा हलविण्याचा अधिकार नाही. - सुभाष पवणे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. किनवट

पर्यायी व्यवस्था केलेल्या शाळेत एक दिवस सोडू. वारंवार कसे सोडणार? जेथे शाळा होती, तेथेच शाळा भरवावी -सय्यद अकबर,पालकविद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मध्यवर्ती भागात तत्काळ सुविधा उपलब्ध करुन द्यावी. अरुणकुमार वतनीवकील, निवृत्त गटशिक्षणाधिकारी, किनवट

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थी