शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ मारले माथी; देशभरात करोडोंचा घोटाळा

By शिवराज बिचेवार | Updated: March 11, 2025 19:43 IST

नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ देत देशभरात केला हजारो कोटींचा घोटाळा

नांदेड : जगभरासह देशातही चलनाला पर्याय ठरू पाहणाऱ्या बिटक्वाॅइन या डिजिटल चलनाच्या महाजालात देशभरातील अनेक जण फसले गेले आहेत. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार भारद्वाज बंधूंनी गुंतवणूकदारांकडून बिटक्वाॅइन घेऊन त्या बदल्यात स्वत: तयार केलेले ‘एम कॅप’ हे चलन माथी मारले. त्यावेळी ‘एम कॅप’चे बाजारात मूल्य केवळ १४ हजार रुपये, तर बिटक्वाॅइनचे ७४ हजार होते. परंतु, हेच एम कॅप जर गुंतवणूकदारांनी भारद्वाजला विक्री केले, तर तो त्या बदल्यात अर्धीच किंमत देत होता. अशा प्रकारे बिटक्वाॅइन आणि एम कॅप या दोन्ही आभासी चलनाद्वारे हजारो जणांना गंडविले.

नांदेडात एमजीएम काॅलेजमधून २००४ साली साॅफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अमित भारद्वाज आणि त्याच्या टोळीने देशभरात केलेल्या गेन बिटक्वाॅइन घोटाळा प्रकरणात मार्चमध्ये ‘सीबीआय’ने देशभरात छापे टाकले आहेत. त्यामुळे नांदेडातून सुरू झालेला हा घोटाळा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नांदेडातील आयुर्वेद महाविद्यालयातील एका डाॅक्टरला भारद्वाजने ५५ लाखांचा गंडा घातल्यानंतर सर्वप्रथम या प्रकरणाची व्याप्ती लक्षात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरातच भारद्वाजच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याची मालिकाच सुरू झाली होती. फसवणूक झालेल्यांची संख्या मराठवाड्यात बरीच मोठी असल्याचे सांगितले जाते.

१० टक्के परतावा दिल्याने विश्वास वाढलाभारद्वाजने गेन बिटक्वाॅइनमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून बिटक्वाॅइन घेतले होते. सुरुवातीचे तीन महिने त्याने परतावाही दिला. परंतु, त्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. त्यात काही गुंतवणूकदारांना त्याने बिटक्वाॅइनच्या बदल्यात स्वत: तयार केलेली डिजिटल करन्सी ‘एम कॅप’ दिली. त्यावेळी ‘एम कॅप’चे बाजारमूल्य फक्त १४ हजार रुपये होते, तर बिटक्वाॅइनची किंमत ७४ हजार होती. परंतु, हेच बिटक्वाॅइन खरेदीदाराने पुन्हा भारद्वाजला विक्री केल्यास त्याची तो निम्म्याहून कमी किंमत देत होता.

पुण्यात अटक होताच मूल्य घसरलेअशा प्रकारे भारद्वाजने बिटक्वाॅइन ग्रोथ फ्रंट या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बिटक्वाॅइन आणि एम कॅप या दोन्ही आभासी चलनाद्वारे हजारो कोटी रुपयांना गंडविले. भारद्वाजला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर एम कॅपचे मूल्य बाजारात चिल्लर पैशावर येऊन पोहचले होते. त्यामुळे लाखो रुपयांचे बिटक्वाॅइन गेले अन् एम कॅपचाही खुर्दा झाला, अशी अवस्था भारद्वाजने गुंतवणूकदारांची केली होती.

पाॅश हाॅटेलमध्ये घेतले जात होते सेमिनारअमित भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांनी नांदेडातील पाॅश हाॅटेलमध्ये एम कॅपमध्ये गुंतवणुकीसाठी सेमिनार घेतले होते. त्यापूर्वी बिटक्वाॅइन खरेदीसाठी नांदेडातील अनेकांनी झेब पे या ट्रेड कंपनीचा वापर केला होता. हे बिटक्वाॅइन खरेदी केल्यानंतर ते भारद्वाजकडे देण्यात आले होते.

टॅग्स :BitcoinबिटकॉइनNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी