आजपासून सरपंच आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:36+5:302021-02-05T06:09:36+5:30

नांदेड : ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लागले असून, आजपासून तहसीलस्तरावर आरक्षण सोडत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात बिलोली, ...

Sarpanch leaving reservation from today | आजपासून सरपंच आरक्षण सोडत

आजपासून सरपंच आरक्षण सोडत

नांदेड : ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लागले असून, आजपासून तहसीलस्तरावर आरक्षण सोडत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात बिलोली, मुखेड, कंधार हे तीन तालुके सोडून उर्वरित १३ तालुक्यातील आरक्षण सोडत पुढील दोन दिवसात पूर्ण होणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.

ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंच पदावरून अनेक ठिकाणी बोली लागल्या होत्या. निवडणूकदरम्यान सरपंच पदावरून होणारा घोडेबाजार थांबविण्याच्या उद्देशाने शासनाने एक आदेश काढून निवडणुकांपूर्वी झालेली आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा नव्याने सोडत घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून, १८ जानेवारी रोजी निकालही लागले. दरम्यान, २४ जानेवारीनंतर सरपंच आरक्षण सोडत लांबवून ती २ आणि ३ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सरपंच पदाचे आरक्षण आज आणि उद्या असे दोन दिवस संबंधित तहसीलस्तरावर सोडण्यात येणार आहे. तर बिलोली, मुखेड, कंधार या तीन तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, सदर तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेल्या रिट याचिकेमुळे तारखेत बदल करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

नांदेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, धर्माबाद, देगलूर या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण २ फेब्रुवारी सकाळी १० वाजता तर अर्धापूर, मुदखेड, हदगाव, माहूर, उमरी, नायगाव, लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ३ फेब्रुवारी रोजी संबंधित तहसीलस्तरावर होईल.

Web Title: Sarpanch leaving reservation from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.