शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मेगाच्या गोदामात साडेबाराशे पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:53 IST

पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो कंपनीवर मारलेल्या धाडीला आता महिना लोटला आहे़ या धाडीत पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रकमधील बऱ्याचशा धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात तीन दिवसांपासून मेगाच्या गोदामातील धान्याची संयुक्त पथकाकडून तपासणी सुरु आहे़ या तपासणीत मेगाच्या गोदामात फक्त साडेबाराशे पोती धान्य असल्याची माहिती आली आहे़ त्यामुळे गोदामात सहा हजार पोती धान्य असल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरण्याची दाट शक्यता आहे़

ठळक मुद्देपोलिसांचा सहा हजार पोत्यांचा दावा फोल ठरणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो कंपनीवर मारलेल्या धाडीला आता महिना लोटला आहे़ या धाडीत पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रकमधील बऱ्याचशा धान्याला कोंब फुटले आहे़ त्यात तीन दिवसांपासून मेगाच्या गोदामातील धान्याची संयुक्त पथकाकडून तपासणी सुरु आहे़ या तपासणीत मेगाच्या गोदामात फक्त साडेबाराशे पोती धान्य असल्याची माहिती आली आहे़ त्यामुळे गोदामात सहा हजार पोती धान्य असल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरण्याची दाट शक्यता आहे़धान्य घोटाळा प्रकरणात संयुक्त पथकाच्या तपासणीमध्ये दररोज नवीन बाबींचा खुलासा होत आहे़ या प्रकरणात आतापर्यंत दोघांचा जामीन बिलोली न्यायालयाने फेटाळल्यामुळे पोलिसांना हुरुप आला आहे़ तर दुसरीकडे संयुक्त पथकाच्या तपासणीत धान्य मोजणी करताना पोलिसांनी कारवाईच्या अहवालात नमूद केलेले अनेक मुद्दे खोडून निघत असल्याचे पुढे येत आहे़सहा सदस्यीय समितीने सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पोलिसांनी जप्त केलेल्या दहा ट्रक धान्याची खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात तपासणी केली़ या तपासणीत ओल लागल्यामुळे यातील बºयाचशा धान्याला कोंब फुटल्याचे आढळून आले़ विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी हे धान्य खराब झाल्यास पोलीसच जबाबदार असतील असे पत्र पोलिसांना दिले होते़ त्यामुळे खराब झालेल्या धान्यासाठी जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे़बुधवारनंतर संयुक्त पथकाने कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील धान्याच्या मोजणीला सुरुवात केली आहे़ या मोजणीत गेल्या दोन दिवसांत गव्हापेक्षा भुश्याचीच अधिक पोती आढळून येत होती़ पोलिसांनी मेगाच्या गोदामात स्वस्त धान्य दुकानातील ५० किलो वजनाची सहा हजार पोती धान्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे़ हाच अहवाल न्यायालयातही सादर करण्यात आला आहे़ तर दुसरीकडे कंपनीने मात्र गोदामात फक्त दीड हजार पोती असल्याचे म्हटले होते़त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या तपासणीत मेगाच्या गोदामात फक्त साडेबाराशे पोती धान्य असल्याची माहिती हाती आली आहे़त्यामुळे पोलिसांनी केलेला सहा पोत्यांचा दावा फोल ठरण्याची दाट शक्यता आहे़ संयुक्त पथकाचा अंतिम अहवाल आल्यानंतर ही बाब स्पष्ट होणार आहे़ परंतु, पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी धान्याच्या पोत्याची मोजदाद केली नव्हती का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे़भुस्सा बॉयलर पेटविण्यासाठीमेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात धान्याच्या पोत्यापेक्षा भुश्याचीच पोती अधिक आढळली असल्याचे संयुक्त पथकाच्या मोजणीत समोर येत आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भुस्सा कशासाठी जमा केला ? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला होता़ त्यावर कंपनीने या ठिकाणी असलेले चार बॉयलर पेटविण्यासाठी हा भुस्सा वापरण्यात येत असल्याचे सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेड