शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Biyani Murder: ‘रिंधा कनेक्शन’ नसावे, पण तपासात हा मुद्दा पोलिसांनी साेडला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:58 IST

Sanjay Biyani Murder: संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतर आठवडा लाेटला तरी पाेलिसांच्या हाती अद्याप ठाेस काही लागलेले नाही.

नांदेड :  येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खुनामागे (Sanjay Biyani Murder ) कुख्यात गुंड रिंधा याचा हात नसावा, अशा प्राथमिक निष्कर्षाप्रत पाेलीस आले आहेत. मात्र, तपासाचा हा मुद्दा पाेलिसांनी अद्याप साेडलेला नाही.

संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतर आठवडा लाेटला तरी पाेलिसांच्या हाती अद्याप ठाेस काही लागलेले नाही. प्रमुख दाेन - तीन मुद्द्यांवर तपास केला जात आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच गुंड रिंधा याचे नाव चर्चिले जाऊ लागले. या अनुषंगाने उच्चपदस्थ पाेलीस अधिकाऱ्याने ‘लाेकमत’ला सांगितले की, गुंड रिंधा याची पार्श्वभूमी, गुन्ह्याची पद्धत लक्षात घेता बियाणी प्रकरणात रिंधा नसावा, असे दिसते. नांदेडमध्ये प्रत्येक माेठ्या घटनेमागे रिंधाचे नाव पुढे करण्याचा जणू पायंडा पडला आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नाही. मात्र, पाेलिसांनी रिंधा हा बियाणी खून प्रकरणातील तपासाचा अँगल अद्याप साेडलेला नाही. दाेन राज्यांत हा तपास केंद्रीत केला गेला आहे. त्यापैकी एका राज्यात पाेलीस पथक गेले असून, दुसऱ्या राज्यात लवकरच जाणार आहे. बियाणी यांच्या निकटवर्तीय मित्रांवरही तपासाचा एक फाेकस आहे. त्यांच्यात भांडण असले तरी ते खुनासारख्या टाेकाच्या निर्णयापर्यंत जातील, असे वाटत नसल्याचे सांगण्यात आले.

धमकी आलेल्या पाच व्यापाऱ्यांना पोलीस सुरक्षा  बियाणी यांच्या खून प्रकरणादरम्यान नांदेड शहरातील आणखी चार ते पाच व्यापाऱ्यांना धमक्या आल्या. त्यांना पाेलीस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी सतत त्यांच्या संपर्कात आहेत. पुन्हा फाेन आल्यास ताे कसा हॅंडल करायचा, याबाबत या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र, पाचही व्यापाऱ्यांना आलेले फाेन हे संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतरचे आहेत. खुनानंतर निर्माण झालेल्या भीतीचा काहीतरी फायदा करून घेण्याच्या उद्देशाने हे फाेन काॅल केल्याचे स्पष्ट हाेते. खुनापूर्वी एक-दाेन काॅल आले. मात्र, ते पुन्हा आले नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बियाणी कुटुंबीयांचा असहकार पण टिका जोरातया पाेलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाेलीस तपासात बियाणी कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्याऐवजी ते पाेलिसांवर टीका करण्यात धन्यता मानतात. या कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्यास पाेलीस तपासाला गती येऊन मदतच हाेईल. अजूनही वेळ गेलेली नाही, बियाणी कुटुंबीयांच्या सहकार्याची, त्यांनी काही सांगण्याची पाेलिसांना प्रतीक्षा आहे.

खरे तेच समोर येईलसंजय बियाणी खून प्रकरणात गुन्हा तातडीने उघडकीस यावा म्हणून पाेलिसांवर सरकार, प्रशासन, जनता व विविध स्तरांतून दबाव आहे. मात्र, हा दबाव झुगारून पाेलीस यंत्रणा काम करीत आहे. दबाव आहे म्हणून प्रकरणात कुणालाही अथवा  चुकीच्या लाेकांना अडकविले जाणार नाही. थाेडा वेळ लागला तरी चालेल, टीका-दबाव सहन करू. पण, खऱ्या गुन्हेगारांनाच अटक केली जाईल. लवकरच पाेलीस बियाणींच्या खुन्यांना अटक करतील, असा विश्वास या उच्च पदस्थ पाेलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू