शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

एस. टी. भाडेवाढीच्या झळा विद्यार्थ्यांनाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:41 IST

नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झळा सहन कराव्यात लागत असून वाढत्या महागाईबरोबरच पालकांना आता विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

ठळक मुद्दे६ हजार विद्यार्थ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इतर खर्चाबरोबर वाढत्या इंधनदरामुळे राज्य परिवहन महामंडळाने १८ टक्के दरवाढ केली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. या दरवाढीचा नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झळा सहन कराव्यात लागत असून वाढत्या महागाईबरोबरच पालकांना आता विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सर्वसामान्य नागरिकांसोबतच शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांसाठी प्रवास करतात. महामंडळाने मानव विकास योजनेतून मुदखेड तालुक्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी निळ्या रंगाच्या ७ विशेष गाड्या असून सुमारे साडेतीनशे विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेतात. तर अहिल्यादेवी होळकर योजनेतून पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ९०० विद्यार्थिनी मोफत प्रवास लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत.मात्र या दोन्ही योजनेत न बसणाऱ्या विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांचे शाळा-महाविद्यालयांसाठीच्या प्रवासाची मदार सवलतीच्या दरात असलेल्या पास योजनेवर आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली नवी दरवाढ या सवलतीच्या पाससाठीही लागू असल्याने नांदेड शहरातील दोन हजार तर ग्रामीण भागातील साडेतीन हजार अशा साडेपाच ते सहा विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य पालक त्रस्त असताना आता पालकांच्या शिक्षणखर्चातही वाढ होत असल्याने सर्वसामान्यांत संताप व्यक्त होत आहे.---‘आवडेल तेथे प्रवास’ ही महागलाराज्य परिवहन महामंडळातर्फे ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना राबविली जाते. ७ व ४ दिवसांचा पास असलेली ही योजना प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. साधी जनता सेवा ते शिवशाही अशा सर्वच गाड्यांसाठी या योजनेतून वेगवेगळ्या दरांमध्ये पास उपलब्ध करुन दिले जातात.१५ आॅक्टोबर ते १४ जून या गर्दीच्या हंगामात दर काहीसे अधिक असतात तर गर्दीचा कमी हंगाम असलेल्या १५ जून ते १४ आॅक्टोबर या कालावधीत कमी दरात पास उपलब्ध होतात. या लोकप्रिय योजनेलाही आता दरवाढीचा फटका बसणार आहे. विशेषत: ‘आवडेल तेथे प्रवास’ हा पास काढून पंढरपूर, आळंदी, गौरी गणपतीसह इतर यात्रेसाठी जाणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेत होते. या सर्व भाविकांनाही आता या पाससाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.---शाळा, महाविद्यालयांना आता सुरूवात झाली आहे. नवीन नांदेडातून शहरात दररोज ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. तसेच नांदेड शहरातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विविध संकुलामध्ये जाणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी विद्यार्थी पासचा मोठा आधार होता. मात्र आता एसटीने इंधन दरवाढीपोटी केलेली १८ टक्के भाडेवाढीचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्याचप्रमाणे चाकरमानेही मासिक, त्रैमासिक पासद्वारे ये-जा करीत होते. आता त्यांच्याही खिशाला झळ बसणार आहे.---पूर्वीच्या पासधारकांना महामंडळाचा दिलासा‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत १५ जूनपूर्वी ज्यांनी पास घेतलेले आहेत. त्यांना १५ जूनपासून चालू होणारी दरवाढ लागू असणार नसून त्यांचे चालू असलेले पास मुदत संपेपर्यंत वैध राहणार असल्याचे नांदेड आगाराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. १६ जूनपासून नवीन पासेस उपलब्ध होईपर्यंत सध्या वापरात असलेल्या त्या-त्या सेवेच्यावर नमूद केलेल्या पासच्या मूल्यात रबरी शिक्क्यांनी मूल्य परिवर्तन करुन जुन्या पासवरील मूल्य खोडण्यात येणार असून त्या ठिकाणी पासच्या मूल्यात वाढ झाल्यास नवीन पासची छपाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या पासवर रबरी शिक्क्यांनी मूल्य बदलून नवीन पास येईपर्यंत वापर करण्यात येणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडstate transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थीFairजत्रा