रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:08 IST2021-02-05T06:08:58+5:302021-02-05T06:08:58+5:30
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर चव्हाण यांच्याशी प्राथमिक ...

रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.
कॅप्शन - क्रिकेटपटू धवल कुलकर्णी व पराग दहिवल यांनी सोमवारी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन नांदेडमध्ये अकादमी उभारणीसंदर्भात चर्चा केली. या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना टी-शर्ट भेट दिले.
फोटो क्र.-०१ एनपीएच एफईबी-२३.जेपीजी