शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

संजय बियाणी यांच्या हत्येमागे रिंदाचाच हात; अखेर ५५ दिवसांनी छडा, सहा आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 07:33 IST

अखेर ५५ दिवसांनी छडा; सहा आरोपींना अटक

नांदेड : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा पोलिसांनी ५५ दिवसांनंतर छडा लावला आहे. दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याच्या साथीदारांनी खंडणी वसुली आणि दहशत निर्माण करण्यासाठी बियाणी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखी आरोपी अटक करण्यात येतील, अशी माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिली.  

५ एप्रिल रोजी सकाळच्या वेळी संजय बियाणी यांची घरासमोरच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पोलिसांवर सर्वच बाजूंनी प्रचंड दबाव होता. पोलिसांनी तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीचे प्रमुख अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह २० अधिकारी आणि ६० पोलीस अंमलदार या तपासात ५५ दिवस अनेक राज्यांत फिरले. बियाणी यांची हत्या खंडणी वसुली आणि दहशत निर्माण करण्यासाठीच करण्यात आली, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले होते.   

या प्रकरणात कट रचणाऱ्या सनी उर्फ तिरथसिंघ मेजर (३५), मुक्तेश्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे (२५), सतनामसिंघ उर्फ दलबिरसिंघ शेरगील (२८), हरदीपसिंघ उर्फ सोनू पिनीपाना बाजवा (३५), गुरमुखसिंघ सेवकसिंघ गील (२४) आणि करणजितसिंघ रघुबीरसिंघ साहू (३०) या नांदेडच्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. बियाणी यांच्यावर गोळीबार करणारे मात्र परराज्यातील असून, ते सध्या फरार आहेत. अटकेतील सहा आरोपींना प्रथमवर्ग न्या. बी. एम. देशमुख यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

ती पिस्टल बाहेर देशातील... बियाणी यांची हत्या ज्या नऊ एमएम या पिस्टलने करण्यात आली. ती पिस्टल बाहेर देशातून आणण्यात आली होती. दहशतवादी रिंदा यानेच ती पिस्टल पाठविली होती. पाकिस्तानमध्ये बसून रिंदा हा सूत्रे हलवित आहे. बियाणी यांची हत्या केल्यानंतर दहशत पसरेल आणि खंडणी उकळणे सोपे होईल, असा त्याचा उद्देश होता.

चार देशात केला पत्रव्यवहार  पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार देशांमध्ये पत्रव्यवहार केला होता, तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात तपासासाठी पथके गेली होती.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिस