राज्यघटनेचे संरक्षण करण्याची जवाबदारी समाजाची : पालकमंत्री अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST2021-02-05T06:11:11+5:302021-02-05T06:11:11+5:30

डॉ. बी. आर. आंबेडकर फाैंडेशन नांदेडच्यावतीने कृष्णाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. ...

Responsibility of the society to protect the Constitution: Guardian Minister Ashok Chavan | राज्यघटनेचे संरक्षण करण्याची जवाबदारी समाजाची : पालकमंत्री अशोक चव्हाण

राज्यघटनेचे संरक्षण करण्याची जवाबदारी समाजाची : पालकमंत्री अशोक चव्हाण

डॉ. बी. आर. आंबेडकर फाैंडेशन नांदेडच्यावतीने कृष्णाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पीआरपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे होते. अशोकराव चव्हाण म्हणाले, समाजात राजकीय वातावरण दूषित झाले आहे. कोणताही घटक सद्य:स्थितीत समाधानी नाही. देशात सुरक्षित वाटत नाही, शाश्वती नाही, न्याय मिळण्याची खात्री नाही. देशासाठी ही बाब लोकशाहीस मारक ठरणारी आहे. शेतकरी आंदोलन उत्तर भारतात होत आहे. दोन महिने आंदोलन चालत असूनही सरकार बधत नाही. सामाजिक उपेक्षा मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकरी हिताचे कायदे करण्याऐवजी धनदांडग्यांच्या हिताचे कायदे केले जात आहेत, या सगळ्या भूमिका अतिशय चिंताजनक आहेत, असे ते म्हणाले.

पत्रकार आशिष जाधव यांना राज्यस्तरीय कृष्णाई पुरस्कार पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व मानपत्र, पत्रकार संभाजी सोनकांबळे यांना जिल्हास्तरीय कृष्णाई पुरस्कार दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, प्रेस फोटोग्राफर सचिन डोंगळीकर यांना जिल्हास्तरीय फोटोग्राफी कृष्णाई पुरस्कार पाच हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन पालकमंत्री अशोक चव्हाण व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व लोकजागृती संस्था, चंद्रपूर यांच्यावतीने नांदेड येथे कलावंतांचे शिबिर घेतले. त्यात मानांकन मिळविलेल्या कलावंतांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

प्रास्ताविक बापूराव गजभारे यांनी केले. सूत्रसंचालन पंढरीनाथ बोकारे व डॉ. विलास ढवळे यांनी तर आकाश गजभारे यांनी आभार मानले.

Web Title: Responsibility of the society to protect the Constitution: Guardian Minister Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.