शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
2
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
3
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
5
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
6
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
7
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
8
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
9
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
10
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
11
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
12
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
13
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
14
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
15
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
16
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
17
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
18
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
19
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
20
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:35 IST

भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.सत्यशोधक विचारमंच व फुले-आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डहाट बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, उद्घाटक दीपक कदम, प्रा. फकरोद्दीन बेनुर, डॉ. बबन जोगदंड, स्वागताध्यक्ष सायलू म्हैसेकर, निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर, शीलवंत वाढवे, डॉ. विशाखा कांबळे, महापौर शीला भवरे, रमणी सोनवणे, डॉ. डी.टी. गायकवाड, विलास सिंदगीकर, किशोर भवरे, विजय सोंडारे, भीमराव हटकर, कोंडदेव हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.डहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना सर्वप्रथम ओबीसी समाजाचा विचार केला होता. त्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाचा त्यांनी विचार केला. सध्याचे सरकार मागासवर्गीय समाजाचे आरक्षण बाद करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणारे कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आदींची हत्या झाली. ही बाब चुकीची असून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले़देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार आणि आचार समजून घेतले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी साहित्याची निर्मिती आवश्यक असल्याचेही डाहाट यांनी सांगितले.प्रास्ताविक सत्यशोधक विचारमंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी केले. त्यांनी १९९८ पासून साहित्य संमेलनाची केलेली सुरूवात त्यात लाभलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती याबद्दल सविस्तर माहिती देवून मागील संमेलनातील आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराची गरज समाजाला असल्याचे सांगितले़डॉ. दीपक कदम यांनी मागासवर्गीय समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून ते वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले़कार्यक्रमात सत्यशोधक समाज भूषण पुरस्काराने पत्रकार प्रशांत गवळे तर अ‍ॅड. विजय गोणारकर, कुंवरचंद मंडले आदींना सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी एन.डी. गवळे, कोंडदेव हाटकर, श्रावण नरवाडे, निमंत्रण डॉ. नागेश कल्याणकर, एन.डी. डोंगरे, संजय जाधव, एम.डी. जोंधळे, एस. ढगे, एन. टी. पंडित, राजा गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.