शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 16:33 IST

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे.

- गोविंद टेकाळे अर्धापूर (जिल्हा नांदेड) : कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाणांच्या अर्धापूर येथील एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजासाठी राजीनामा द्या, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

अर्धापूर शहरात वडगाव ( ता. हदगाव) येथील तरूणाने, नायगाव तालुक्यातील भोपळा येथील विद्यार्थी आणि हिमायत नगर येथील एका तरुणाने अशा जिल्ह्यातील तिघांनी मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांत आत्महत्या केली. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे. आज तालुक्यातील भाऊराव कारखाना येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण उपस्थित होते.यावेळी भास्करराव खतगावकर, अमर राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, चव्हाण भाषण करत असतानाच मराठा आरक्षणाची मागणी करत काही तरुणांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाच्या सन्मानार्थ राजीनामा द्या., अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पिंपळगाव महादेव येथील जगन कल्याणकर, दिगंबर कल्याणकर व शैलेश कल्याणकर अशी आंदोलकांची नावे आहेत.

अर्धापुरातील प्रत्येक गावात नेत्यांना गावबंदी..सोमवारी अर्धापूर येथील सकल मराठा  समाजाने प्रत्येक गावात मुख्य ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना गाव बंदीचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात नेत्यांना गावबंदी केली आहे. नेत्यांना तालुका बंदीचे फलक लवकरच लावण्यात येतील अशी माहिती संयोजक समितीने दिली आहे.

मीच टार्गेट का ?मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. मात्र, माझ्या भागातील आंदोलक मलाच टार्गेट का करत आहेत ? तिकडे लोहा, कंधार, मुखेड या भागात का आंदोलने होत नाहीत?  हे मराठा समाजाच्या आपल्या पोरांनी समजून घेतले पाहिजे. आरक्षण देणे हा राज्याचा विषय नसून केंद्राचा विषय आहे. ईडब्ल्यूएस च्या धर्तीवर केंद्राने आरक्षण दिले पाहिजे, असे आ. चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण