कामरसपल्ली ग्रामपंचायत सरपंचपदी रेणुकाबाई मालेगावे तर उपसरपंचपदी रामराव नाईक यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST2021-02-14T04:17:10+5:302021-02-14T04:17:10+5:30

कामरसपल्ली ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य आहेत. सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. १३ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एल. जी. ...

Renukabai Malegaon elected as Kamarsapalli Gram Panchayat Sarpanch and Ramrao Naik as Deputy Sarpanch | कामरसपल्ली ग्रामपंचायत सरपंचपदी रेणुकाबाई मालेगावे तर उपसरपंचपदी रामराव नाईक यांची बिनविरोध निवड

कामरसपल्ली ग्रामपंचायत सरपंचपदी रेणुकाबाई मालेगावे तर उपसरपंचपदी रामराव नाईक यांची बिनविरोध निवड

कामरसपल्ली ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य आहेत. सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. १३ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एल. जी. तोटावाड व सहायक ग्रामसेवक बी. एस. काठेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. सरपंच पदासाठी रेणुकाबाई पिताजी मालेगावे तर उपसरपंच पदासाठी रामराव सखाराम नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने, बिनविरोध निवड करण्यात आली.

मालीपाटील बालाजी गुणवंतराव, श्रीरामे गिन्यानबाई परसराम, जाधव लक्ष्मीबाई हणमंत, कांबळे हणमंत भीमराव, सूर्यवंशी सुमनताई शंकर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी रामराव नाईक, भारत मधुकर (मा.पा.) शिवाजी जाधव, रामराव जाधव, गोविंदराव मालीपाटील, शंकर सूर्यवंशी, मधुकरराव जहागीरदार, दिगांबर मालेगावे, मोहन वाघमारे, राम वाघमारे, लक्ष्मण मालेगावे, मोहन श्रीरामे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Renukabai Malegaon elected as Kamarsapalli Gram Panchayat Sarpanch and Ramrao Naik as Deputy Sarpanch