माहूर शहरासाठी ‘दिगडी’तून पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:43 IST2018-03-22T00:42:51+5:302018-03-22T00:43:23+5:30
माहूर शहर व तालुक्यातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी दिगडी साकूर येथील बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची गरज आहे, असे झाले तर माहूरसह २५ गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या, शेती व जनावरांच्या पाण्याचीही समस्या सुटू शकते.

माहूर शहरासाठी ‘दिगडी’तून पाणी सोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : माहूर शहर व तालुक्यातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी दिगडी साकूर येथील बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची गरज आहे, असे झाले तर माहूरसह २५ गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या, शेती व जनावरांच्या पाण्याचीही समस्या सुटू शकते.
डिसेंबर २०१७ मध्ये माहूर नगरपंचायतीने ५ लाख ७४ हजार रुपये उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने १.५० दलघमी पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे माहूरसह परिसरात पाणीटंचाईवर मात करण्यात आली. आता या आठवड्यात पाणीटंचाई उग्र ्ररुप धारण करीत आहे. माहूर शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा पैनगंगा नदीवर अवलंबून आहे. पैनगंगाच कोरडी पडल्याने इसापूर किंवा साकूर, दिगडी कु. बंधाºयातून पैनगंगेत पाणी सोडणे आवश्यक आहे.
नदीकाठावरील रुई, आनमाळ, हडसणी, दिगडी (कु.) ग्रामपंचायतने पाणीटंचाईचे ठराव घेवून पंचायत समितीकडे सुपूर्द केले. याविषयी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी १४ मार्च रोजी चर्चा करुन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.
नगराध्यक्ष दोसाणी, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी रेणुकादेवी संस्थानला पैनगंगा नदीच्या कोल्हापुरी बंधाºयात पाणी सोडण्यासाठी आर्थिक हातभार लावाला, असे पत्र संस्थानचे पदसिद्ध सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे दिले.
तीर्थक्षेत्र माहूरसाठी पाणीस्त्रोत असलेल्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाºयातील पाणी पूर्ण आटल्याने माहूर पाणीपुरवठा योजनेवर त्याचा परिणाम झाला. रेणुकादेवी संस्थान किंवा जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करुन दिल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल.