बाधितांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST2021-04-18T04:17:18+5:302021-04-18T04:17:18+5:30

चौकट........ ऑक्सिजनची दररोज ३० टन मागणी जिल्ह्यात ऑक्सिजनची एकूण मागणी २८ ते ३० टनांची आहे, तर सद्य:स्थितीत ३९ टन ...

Relatives of the victims continue to run | बाधितांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरूच

बाधितांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरूच

चौकट........

ऑक्सिजनची दररोज ३० टन मागणी

जिल्ह्यात ऑक्सिजनची एकूण मागणी २८ ते ३० टनांची आहे, तर सद्य:स्थितीत ३९ टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यातही काही अडचणी आल्यास ऑक्सिजन मिळण्यास विलंब होतो. पर्यायाने ऑक्सिजनसाठी रुग्णालयांना धावाधाव करावी लागते. जिल्ह्यात ९३ के.एल. स्टोअरेजची क्षमता असून ऑक्सिजनचे १३ टन रोज उत्पादन घेतले जात आहे.

९२५ रेमडेसिविरचा पुरवठा

वाढत्या रुग्णसंख्येमुळे गंभीर रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळेच रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरचा आग्रह धरतात. मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत असल्याने या नातेवाइकांना धावाधाव करावी लागते. शनिवारी ९२५ रेमडेसिविर इंजेक्शन कंपनीकडून पाठविण्यात आले. यातील ५०८ इंजेक्शन खाजगी कोविड सेंटरच्या मेडिकलकडे वितरित करण्यात आले.

२०० केंद्रांवर लसीचा तुटवडा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळेच नांदेड शहरासह ग्रामीण भागातही लसीकरणासाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील ४०० केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असले तरी त्यातील २०० केंद्रांवर व्हॅक्सिनचा तुटवडा असल्याचे दिसून आले.

Web Title: Relatives of the victims continue to run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.