‘रथ सप्तमी’ जागतिक प्रवासी दिन साजरा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:19 IST2021-02-16T04:19:15+5:302021-02-16T04:19:15+5:30
त्या अनुषंगाने १४ फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता सीताराम मंदिर चिखलवाडी येथे, संघटनेची बैठक संपन्न झाली. ...

‘रथ सप्तमी’ जागतिक प्रवासी दिन साजरा करणार
त्या अनुषंगाने १४ फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता सीताराम मंदिर चिखलवाडी येथे, संघटनेची बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत रथसप्तमी प्रवासी दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड जिल्हा आगार व्यवस्थापकांना, आगार परिसरात प्रवासी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महामंडळाच्या विना अपघात (बस)वाहन चालवणाऱ्या चालकांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचा संघटनेतर्फे सत्कार येणार आहे. नांदेड रेल्वे स्थानक प्रमुखालासुद्धा जागतिक प्रवासी दिन रेल्वे स्टेशन परिसरात साजरा करण्यात येणार आहे. सदरील बैठकीस ॲड. शलाका ढमढेरे, ॲड. विना शेवडीकर,पोत्रेकर, पुष्पा संगारेड्डीकर, प्रा. डॉ. बा.दा. जोशी, प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, रंगनाथ उंबरकर, रमाकांत घोणसीकर, राजेश्वर कमटलवार, किरण कामतीकर आदींची उपस्थिती होती.