बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:29+5:302021-02-05T06:09:29+5:30
रेल्वे अपघातात अथवा रेल्वेच्या परिसरात एखादा मृतदेह आढळून आल्यास त्याची चौकशी केली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचा पत्ता अथवा नातेवाइकांचा ...

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक
रेल्वे अपघातात अथवा रेल्वेच्या परिसरात एखादा मृतदेह आढळून आल्यास त्याची चौकशी केली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचा पत्ता अथवा नातेवाइकांचा शोध लागत नसेल, तर विविध माध्यमांच्या सहकार्याने संबंधित मृतदेहाच्या वर्णनाची बातमी प्रसिद्ध करून तीन दिवस नातेवाइकांची वाट पाहिली जाते. कोणी नातेवाईक आले नाही अथवा संबंधितांच्या नातेवाइकांचा शोध नाही लागला तर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात.
- सोपान भाईक, पोलीस निरीक्षक, रेल्वे ठाणे नांदेड.
चौकट
रेल्वे हद्दीत सापडलेल्या मृतदेहांपैकी बऱ्याच मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. रेल्वे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांचा शोध ताबडतोब नाही लागला तर त्यांच्यावर लगेचच अंत्यसंस्कार केले जातात. नांदेड रेल्वे विभागाच्या हद्दीत असणाऱ्या विविध पोलीस ठाणे आणि चौक्यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक बेवारसांच्या नातेवाइकांचा शोध लावण्यात आला; परंतु मनोरुग्ण अथवा भिकारी असलेल्या नातेवाइकांचा शोध लावताना दमछाक होते. अशांच्या नातेवाइकांचा शोधही लागत नाही.