चहा पिण्यासाठी जिल्ह्याला दररोज लागणार तीन हजार कुल्हड रेल्वे मंत्र्यांची घोषणा, चहा विक्रेत्यांना कुल्हडविषयी अद्याप सूचना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:28 IST2020-12-05T04:28:53+5:302020-12-05T04:28:53+5:30
राजस्थानक, गुजरातमधून येतात कुल्हड नांदेडमध्ये काही चहा विक्रेते कुल्हडमध्ये चहा विक्री करतात. ते राजस्थान, गुजरात राज्यातून कुल्हड मागवतात; ...

चहा पिण्यासाठी जिल्ह्याला दररोज लागणार तीन हजार कुल्हड रेल्वे मंत्र्यांची घोषणा, चहा विक्रेत्यांना कुल्हडविषयी अद्याप सूचना नाही
राजस्थानक, गुजरातमधून येतात कुल्हड
नांदेडमध्ये काही चहा विक्रेते कुल्हडमध्ये चहा विक्री करतात. ते राजस्थान, गुजरात राज्यातून कुल्हड मागवतात; परंतु रेल्वेस्थानकावर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर स्थानिक कुंभार कारागिरांना कुल्हड तयार करून विक्रीची संधी मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
चहाविक्रेते अनभिज्ञ
कुल्हडधून चहा विक्री करण्यासंदर्भात अद्यापर्यंत आम्हाला कळविले नाही. कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेले असताना एका कुल्हडसाठी दीड ते दोन रुपये खर्च परवडणारा नाही. - खलील, चहा विक्रेता.
कोरोनामुळे चहा विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात अतिरिक्त खर्च करणे परवडणारे नाही. सध्या आम्ही कागदी कप वापरतो. रेल्वेमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे; परंतु तो परवडणाराही हवा. - सुमेध गायकवाड, चहा विक्रेता.