नांदेडमध्ये कॉफी शॉपवर धाड, पाच जोडपी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST2020-12-05T04:29:22+5:302020-12-05T04:29:22+5:30
नांदेड : शहरातील रविनगर भागात एका कॉफी शॉपवर शुक्रवारी पोलिसांनी धाड मारली. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या पाच जोडप्यांना पोलिसांनी ...

नांदेडमध्ये कॉफी शॉपवर धाड, पाच जोडपी पकडली
नांदेड : शहरातील रविनगर भागात एका कॉफी शॉपवर शुक्रवारी पोलिसांनी धाड मारली. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या पाच जोडप्यांना पोलिसांनी पकडले. तसेच कॉफी शॉपमध्ये काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. या प्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
गेल्या अनेक दिवसांपासून या कॉफी शॉपमध्ये गैरप्रकार सुरू होते. शहरात कॅनॉल रोड, भाग्यनगर, आनंदनगर यासह कौठा भागात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघण्यात आले होते. या कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यावर धाडी मारून हे कॉफी शॉप बंद केले होते; परंतु काैठा भागात काही दिवसांपूर्वीच नव्याने कॉफी शॉप उघडण्यात आले होते. दोन शटरमध्ये असलेल्या या कॉफी शॉपमध्ये दोन फ्लोअर करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी पाच जोडपी आक्षेपार्ह स्थितीत तेथे आढळून आली. त्यामध्ये पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीचाही समावेश होता. यावेळी पोलिसांनी कॉफी शॉप चालकाला ताब्यात घेतले होते.
जोडपे आत, बाहेरून कुलूप
दुसऱ्या शटरमध्ये जोडप्यांना आत प्रवेश दिल्यानंतर बाहेरून कुलूप लावून शॉपचा मुलगा निघून जात होता. त्यानंतर दीड ते दोन तासाने फोन आल्यानंतर तो परत येऊन कुलूप उघडत होता. या ठिकाणी एका तासासाठी साधारणत: पाचशे ते सातशे रुपये आकारण्यात येत होते. यामध्ये अल्पवयीन तरुणींचाही समावेश होता.