शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

थकीत मानधनासाठी सीएचबी प्राध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:23 AM

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयात अनुदानित घड्याळी तासिकेवर काम करणा-या प्राध्यापकांचे मानधन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत गत सहा महिन्यापासून रोखल आहे़

ठळक मुद्देनिधीअभावी सहा महिन्यापासून मानधन रोखले

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयात अनुदानित घड्याळी तासिकेवर काम करणा-या प्राध्यापकांचे मानधन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत गत सहा महिन्यापासून रोखल आहे़ अनेक वेळा निवेदन देऊनही मानधन मिळत नसल्याने सीएचबी प्राध्यापकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे़ यासंदर्भात गुरूवारी सहसंचालकांना निवेदन दिले आहे़स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातील हजारो प्राध्यापक घड्याळी तासिकेवर मानधनावर काम करतात़ सदरील प्राध्यापकांचे आॅक्टोबर २०१८ पासून मानधन रखडले आहे़ शासनाने १४ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून घड्याळी तासिकेवर काम करणाºया प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली़ सर्व महाविद्यालयाने सहा महिन्यापूर्वीच सीएचबी प्राध्यापकांचे वाढीव देयके उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केले़ परंतु सहसंचालक कार्यालयाने मात्र आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मानधन देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे़ एकीकडे तासिका तत्वावर काम करणाºया प्राध्यापकांकडे पूर्ण पात्रता आहे़ परंतु अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते़ महाविद्यालयातील परीक्षा असो किंवा अन्य इतर सर्व कामे सीएचबी प्राध्यापकांना नाईलाजास्तव करावे लागतात़ वर्षातून केवळ दोन वेळेस या प्राध्यापकांना मानधन मिळते़ वर्षभर त्यांना हलाखीचे जीवन जगत संघर्ष करावा लागत आहे़ सहा महिन्यापासून रखडलेले मानधन येत्या पंधरा दिवसात न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे़ निवेदनावर प्रा़ डॉ़ एस़ आऱ रगडे, प्रा़ आऱ जी़ कुंटूरकर, प्रा़ धुळे, प्रा़ गिरी, प्रा़ व्ही़ डी़ जाधव, प्रा़ बीचेवार, प्रा़ मारोती देशमुख, प्रा़ स्वामी, प्रा़ बी़ आऱ नरवाडे आदींच्या स्वाक्ष-या आहेत़अनेक महाविद्यालयात मानधनाला कात्रीतासिका तत्वावरील काम करणा-या प्राध्यापकांना एक तर महाविद्यालयात शिकवणी करीत असताना सात तासिकेचा आदेश असतो़ परंतु त्यांना मात्र आठ किंवा नऊ तासिकेचा कार्यभार घ्यावा लागतो़ उर्वरित एक किंवा दोन तासिकेचे मानधन मिळत नाही़ तर दुसरीकडे अनेक महाविद्यालयात मात्र आलेल्या एका एका प्राध्यापकांच्या मानधनातून पाच ते सहा हजार रूपयांची कपात केली जाते़ हा प्रकार म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार तासिका तत्वारील प्राध्यापकांना सहन करावा लागत आहे़

टॅग्स :NandedनांदेडProfessorप्राध्यापकEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय