‘निराळ्या विश्वात जगताना"" चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:18+5:302020-12-27T04:13:18+5:30
प्रा.डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार (पुदरोड) लिखित ''''निराळ्या विश्वात जगताना'''' या लेखसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात फुलारी बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य परिषद ...

‘निराळ्या विश्वात जगताना"" चे प्रकाशन
प्रा.डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार (पुदरोड) लिखित ''''निराळ्या विश्वात जगताना'''' या लेखसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात फुलारी बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर, ॲड. दीपा बियाणी आणि अनुजा डोईफोडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रकाशक पांडुरंग पुठ्ठेवाड यांनी प्रास्ताविक केले. लेखिका डॉ. पुरणशेट्टीवार यांनी मनोगतात लेखनामागच्या प्रेरणा सांगितल्या. अनुजा डोईफोडे यांनी वंचितांच्या वेदना शब्दांकित केल्याबद्दल लेखिकेचे काैतुक केले. डॉ. पाटोदेकर यांनी उपेक्षित व दु:खी मुलांचे विश्व जगासमोर मांडण्यात लेखिका यशस्वी झाल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्रभाकर कानडखेडकर यांनी या पुस्तकात आजच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या वास्तव व्यथा मांडल्याचे सांगितले. सूत्रसंचालन कवी वीरभद्र मिरेवाड यांनी केले, तर आभार डॉ. अनिता पुदरोड यांनी मानले. या कार्यक्रमास प्रामुख्याने माधव चुकेवाड, प्राचार्य राम जाधव, निर्मलकुमार सूर्यवंशी, दिगांबर कदम, अशोक कुबडे, महेश मोरे, धाराशिव शिराळे, डॉ. हरदीपसिंघ, श्यामला बोराळकर, डॉ. ज्योती डोईफोडे, विद्या आळणे, अल्का चुकेवाड, डॉ. नंदिनी चौधरी, डॉ. कोरे आदींची उपस्थिती होती.