नांदेड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने नांदेड शहरामध्ये साजरी करण्यासाठी यावर्षी शहरात प्रथमच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी नांदेड शहरातील भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर, तर स्वागताध्यक्षपदी मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर समितीच्या उपाध्यक्षपदी पीयूष शिंदे पाटील, सचिवपदी शंकर पवार निवघेकर, संघटकपदी प्रा. प्रभाकरराव जाधव पाटील, कार्याध्यक्षपदी ॲड. बालाजी शिरफुले, सहसचिवपदी बालाजी इंगळे पाटील, कार्यकारिणी सदस्यपदी विनायकराव चव्हाण, रवी ढगे पाटील, संदीप पावडे, डॉ. प्रशांत तावडे, पांडुरंग पोपळे पाटील, ज्ञानोबा गायकवाड, प्रशांत आबादार, मोतीराम पवार, विजय शिंदे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी भागवत देवसरकर, शेख रहीम यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी शिवजयंतीच्या माध्यमातून १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दीपोत्सव, १९ फेब्रुवारी रोजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पवृष्टी व अन्नदानाचा कार्यक्रम, २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील शिवप्रेमींसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम, गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना शिवजयंती सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण तसेच शिवप्रेमींना आमंत्रण देऊन शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर, स्वागताध्यक्ष धनंजय पाटील व प्रसिद्धीप्रमुख भागवत देवसरकर यांनी दिली आहे.