खंडीत पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा मिळवून द्या : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST2021-09-03T04:19:39+5:302021-09-03T04:19:39+5:30

जिल्ह्यामध्ये यावर्षी एकूण ७ लक्ष ५६ हजार हेक्टर जमिनीवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली. त्यापैकी तब्बल ५ लक्ष १३ ...

Provide advance crop insurance to farmers affected by intermittent rains: Guardian Minister | खंडीत पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा मिळवून द्या : पालकमंत्री

खंडीत पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा मिळवून द्या : पालकमंत्री

जिल्ह्यामध्ये यावर्षी एकूण ७ लक्ष ५६ हजार हेक्टर जमिनीवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली. त्यापैकी तब्बल ५ लक्ष १३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला. या विम्यापोटी एकूण ६३० कोटी रुपये कंपन्यांकडे शेतकरी व शासनामार्फत जमा करण्यात आले.

प्रतिकुल हवामान परिस्थिती अर्थात मिडसिझन ॲडव्हर्सिटी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के रक्कम विमा कंपन्यांनी द्यावी, असे शासननिर्णयात म्हटले आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात २६ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत तब्बल २२ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्याचा प्रतिकूल परिणाम सर्वच पिकांवर झाला. ५० टक्क्यांपेक्षा जास्तीचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसते तसा सर्व्हे सुध्दा करण्यात आला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आगाऊ पीकविमा मिळवून देण्यासाठी त्यासंबंधीची अधिसूचना निर्गमित करावी. जेणेकरून शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानीची भरपाई देण्यासाठी विमा कंपनीला भाग पाडण्यात येईल. अशी सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनास दिली आहे.

Web Title: Provide advance crop insurance to farmers affected by intermittent rains: Guardian Minister