गॅस दरवाढीचा भोकरमध्ये निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:19+5:302020-12-29T04:17:19+5:30

भोकर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्क चूल पेटवून स्वयंपाक करीत केंद्र सरकारच्या गॅस ...

Protest against gas price hike in Bhokar | गॅस दरवाढीचा भोकरमध्ये निषेध

गॅस दरवाढीचा भोकरमध्ये निषेध

भोकर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्क चूल पेटवून स्वयंपाक करीत केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करून सोमवारी सायंकाळी आंदोलन केले आहे.

गृहोपयोगी गॅसचे दर केंद्रातील भाजपा सरकारने नुकतेच वाढविले आहेत. यामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने शहरातील प्रमुख चौकात चक्क चूल पेटवून स्वयंपाक केला. यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणा आंदोलक महिलांनी दिल्या. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, अ‍ॅड. कल्पना पाटील डोंगळीकर, तालुका अध्यक्ष यशोदाबाई शेळके, प्रवीण शेख, छाया कांबळे आदींसह तालुका अध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार, शहर युवक अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी कदम, अमोल कपाटे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता. सपोनि शंकर डेडवाल यांच्यासह पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले होते.

Web Title: Protest against gas price hike in Bhokar