शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

मुदखेडचे ग्रामदैवत श्री कालेजी देवी मंदिरात नवरात्री महोत्सवानिमित्ताने कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:08 AM

मुदखेडची ग्रामदेवता श्री कालेजी देवी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नवरात्री महोत्सव अतिशय आनंदी व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : मुदखेडची ग्रामदेवता श्री कालेजी देवी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नवरात्री महोत्सव अतिशय आनंदी व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.नवरात्री महोत्सव काळात दिवसभरातून दोन वेळा म्हणजे दुपारी १:३० वाजता आणि सायंकाळी ७:३० वाजता असे दोन वेळा श्री कालेजी मातेची आरती केली जाते. प्रतिदिन सकाळी ६ ते ७ दरम्यान भक्तीफेरी (जोगवा) असतो. नंतर सकाळी ९ वाजता दुर्गा सप्तशतीचा पाठ घेतला जातो. १० रोजी घटस्थापना व प्रसाद झाल्यावर सायंकाळी ७:३० वाजता मातेची आरती झाली. १२ आक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात वेळ १० ते १२:४५ पर्यत श्री कालिदास चौधरी यांचे भक्ती गायन,सायंकाळी वेळ ४:३० ते ७ पर्यंत प्रज्ञा पळसोदकर देशपांडे यांचे कीर्तन, १३ रोजी सकाळच्या सत्रात राजश्री जोशी यांचे भक्तीगायन, सायंकाळी सत्रात वेळ ४:३० ते ७ दरम्यान ह.भ.प.अवधुत महाराज (टाकळीकर) यांचे कीर्तन आहे. १४ आॅक्टो रोजी सकाळच्या सत्रात अशोकराव सावंत (नांदेड) यांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी ह.भ.प.विलासराव लिंबेकर महाराज यांचे कीर्तन, १५ रोजी सकाळी कै.यशवंतराव डांगे संगीत विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ह.भ.प. विनायक टलु महाराज यांचे कीर्तन, १६ रोजी सकाळी ब्रह्मानंद येळेगावकर यांचा गोंधळ कार्यक्रम, सायंकाळी ह.भ.प.संजय जोशी महाराज (परभणी) यांचे कीर्तन होईल.१७ रोजी सकाळी श्रीवर्धन श्रीरंगराव चौधरी यांचे एकपात्री नाटक (वºहाड निघाले लंडनला) तर सायंकाळी मैनाबाई हिपनारीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. याच दिवशी सायं़ ७:३० आरती नंतर गोंधळ व प्रसादचा कार्यक्रम राहील. १८ आक्टोबर नवमी-दशमी गुरवार रोजी होमहवन होणार आहे़ या होम हवनाचे यजमान संतोषसिंग दिंगाबरसिंग ठाकुर आहेत आणि सायंकाळी ४ नंतर श्री कालेजी मातेची पालखी सीमोलंघनासाठी निघणार आहे.दरवर्षी श्री मातेच्या पालखी हजारो भक्त सोबत असतात. बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली . मुदखेड वासियांची ग्रामदैवत आई श्री कालेजी माता भक्तांसाठी संकटमोचक, नवसाला पावणारी, विद्येची देवता, भक्तावरील संकटे दूर करणारी माता म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.माहुरला बहारदार संगीत सेवामुदखेड : माहूर गडावर बुधवारी उत्साहात श्री रेणुकादेवीच्या नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी संगीत सेवेमध्ये कलावंतानी उत्कृष्ठ कला, गायन सादर करून भाविकांची मने जिंकली. बुधवारी सकाळी साडेपाच वाजता पासून पंडीत नितीन धुमाळ यांनीउत्कृष्ट सनई वादन केले. दुपारच्या सत्रात डॉ. गौरी बोधनकर व संच अमरावती यांनी भक्ती संगीत सादर केले. सायंकाळच्या सत्राचे न्या. चैतन्य कुलकर्णी यांनी दिपप्रज्वलन केले. पंडीत भिमसेन जोशी यांचे शिष्य डॉ. अविराज तायडे नाशिक यांनी आईचा गोंधळ,भारुड, जोगवा, अभंगाचे सादरीकरण केले. कलावंतांचा श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने सत्कार विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, समीर भोपी, भवानीदास भोपी, श्रीपाद भोपी, आशीष जोशी यांंनी सत्कार कोल. सूत्रसंचालन कृतीका वरणगावकर यांनी केले.बुधवारी नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे माजी सभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे, नामदेवराव केशवे यांनी गडाला भेट देवून श्री रेणूका मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर संस्थानतर्फे विश्वस्थ चंद्रकात भोपी, संजय कान्नव, भवाणीदास भोपी यांनी सत्कार केला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष प्रभारी जिल्हा सत्र न्यायाधीश सुभाष खरात, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर, विश्वस्थ समिर भोपी, श्रीपाद भोपी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडNavratriनवरात्री