विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:39 IST2020-02-06T13:37:56+5:302020-02-06T13:39:24+5:30

मुख्य आरोपी अद्यापही फरारच

Pre-arrest bail of accused rejected in student rape case of shankarnagar | विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

ठळक मुद्देशंकरनगर येथील घटना  मुख्य आरोपीचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न

बिलोली : तालुक्यातील शंकरनगर येथील 'त्या' शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरार मुख्य आरोपी दयानंद राजुळेचा अटकपूर्व अर्ज जिल्हासत्र न्या़ विक्रमादित्य मांडे यांनी फेटाळला़ 

शंकरनगर प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल व सदरील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांची पोलीस कोठडीनंतर तुरुंगात रवानगी करण्यात आली़ परंतु, गत १८ दिवसांपासून मुख्य आरोपी दयानंद राजुळे हा फरारच आहे़ 

सहावीच्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षक सय्यद रसूल व राजूरे याने लैंगिक अत्याचार केला. तर हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य शेळके यांनी प्रयत्न केले होते. या प्रकरणी चारही शिक्षकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी सय्यद रसूल, शेळके, प्रदीप पाटील यांना अटक झाली़  मात्र, नराधम शिक्षक राजुळे अद्यापही फरारच आहे. गेल्या        अनेक दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज बिलोलीच्या जिल्हा सत्र न्या.विक्रमादित्य मांडे यांनी                  ५ फेब्रुवारी रोजी फेटाळला          आहे.  आरोपी राजुळे यास राजकीय       पाठबळ दिले जात असून पोलीस त्याला जाणीवपूर्वक अटक करीत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघडीचे प्रा. रामचंद्र भरांडे, राहुल जिगळेकर यांच्यासह विविध संघटनांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे़ 

मुख्य आरोपीचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
या प्रकरणातील नराधम शिक्षक राजुळे अद्यापही फरारच आहे. गेल्या        अनेक दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज बिलोलीच्या जिल्हा सत्र न्या.विक्रमादित्य मांडे यांनी               ५ फेब्रुवारी रोजी फेटाळला आहे. 

Web Title: Pre-arrest bail of accused rejected in student rape case of shankarnagar