शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

नांदेड शहरात सात कॉफी शॉपवर पोलिसांच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 1:18 AM

प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ़अश्विनी शेंडगे यांनी ही कारवाई केली़ या कारवाईमुळे कॉफी शॉप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे़

नांदेड : शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लीलतेसाठी वाव देणाऱ्या सात कॉफी शॉपवर पोलिसांनी धाडी मारल्या़ यावेळी अनेक जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले़ प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ़अश्विनी शेंडगे यांनी ही कारवाई केली़ या कारवाईमुळे कॉफी शॉप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे़शहरात महाविद्यालय परिसर तसेच शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत भागात अनेक कॉफी शॉप उघडण्यात आले होते़ या कॉफी शॉपमध्ये खुलेआम महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याचे उघडकीस आले होते़ त्यानंतर पावडेवाडी भागातील पंधरा कॉफी शॉपचे परवाने निलंबित करण्यात आले होते़त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कौठा तर विमानतळ पोलिसांनीही दोन कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ यावेळीही अनेक जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले होते़ त्यानंतर कॉफी शॉपमध्ये सुरु असलेला हा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला होता़दरम्यान, पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कॉफी शॉपवर कारवाईचे आदेश दिले होते़ त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ़अश्विनी शेंडगे यांनी विशेष पथकासह भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात कॅफे शॉपीवर धाडी मारल्या़त्यात कँडी क्रश, ड्रीम लँड, स्वीट लँड, रोमांसा, स्वीट ट्रीट, कृश, फ्रेंडस् कॉर्नर तसेच नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील लव्ह बर्डस या कॉफी शॉपवर धाडी मारल्या़या कॅफेमध्ये अंतर्गत स्वतंत्र छोटे कप्पे तयार करुन मंद प्रकाशात फक्त जोडप्यांना प्रवेश दिले जात होते़या ठिकाणी असभ्य वर्तन सुरु असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले़ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार या कॉफी शॉपच्या चालकाविरोधात कारवाई करण्यात आली़ या कॉफी शॉपचे परवाने निलंबित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही डॉ़शेंडगे यांनी सांगितले़ दरम्यान, शहरात अद्यापही अनेक भागात कॉफी शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरुच असून पोलिसांना कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीस