शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पोलिसावर काळाचा घाला; नांदेड- नागपूर महार्गावर अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 13:36 IST

नांदेड-नागपूर महामार्गावर असना पुलावरील घटना

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ) : दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास असणा पुलावर जागीच मृत्यू झाला. मनोहर मारोती पवळे ( कुरूळा ता. कंधार ) असे मृताचे नाव असून ते जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी होते. घटनास्थळी अतीरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, महामार्ग प्र.अदित्य लाकुळे, पोलीस निरीक्षक हानुमंत गायकवाड यांनी भेट दिली.

जिंतूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले मनोहर मारोती पवळे ( ४२) हे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत होते. दरम्यान, असणा पुलावर दुचाकी आणि अज्ञात वाहनाची जबर धडक झाली . यात मनोहर पवळे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती कि यात दुचाकी चकनाचूर झाली.

घटनेची माहिती मृत्युंजय दुत यांनी पोलीसांना कळवली. घटनास्थळी महामार्ग व अर्धापूर पोलीस दाखल झाले. यावेळी महेश कात्रे, शेख माजिद, वसंत शिनगारे, मृत्युंजय दुत जी.जी. टेकाळे,अजय देशमुख, सयाजी कदम, सतीश श्रीवास्तव, गोविंद कल्याणकर, राजू धाडवे, सचिन खेडकर,ए.एस. बेग,महेंद्र डांगे, बालाजी तोरणे, माधव पाटील यांनी घटनास्थळी मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात मयताचे शव पुढील प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविण्यात आले.

अपघातातील मयत पोलीस कर्मचारी मनोहर मारोती पवळे मुळ गाव कुरूळा ता.कंधार असुन ते सध्या नमस्कार चौक येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. या दुर्देवी घटनेबद्दल सर्व स्तरातून हळद व्यक्त होत आहे. सदर घटने प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसAccidentअपघात