देशातील अराजकतेचे चित्र चिंता वाढविणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:15+5:302021-02-05T06:09:15+5:30
यावेळी मंचावर आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. श्यामसुंदर शिंदे, महापौर मोहिनी येवनकर, माजी पालकमंत्री ...

देशातील अराजकतेचे चित्र चिंता वाढविणारे
यावेळी मंचावर आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. श्यामसुंदर शिंदे, महापौर मोहिनी येवनकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार वसंव्हाण, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषद उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालविकास सभापती सुशीलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर, साहेबराव धनगे, लक्ष्मण ठक्करवाड, गोविंदराव नागेलीकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी सावित्रीबाई फुले पुरस्काराने संध्याताई दत्तात्रेय बारगजे व बेबीसुरेखा मनोहर शिंदे यांना, तर नरहर कुरुंदकर पुरस्काराने डॉ. सुरेश सावंत व आशा पैठणे यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ, शॉल, पुष्पहार व दीड लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आनंदी विकास व संच यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले. कार्यक्रमस्थळी शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले होते. बाळासाहेब कच्छवे यांची मेंदूची व्यायामशाळा हा एक नावीन्यपूर्ण प्रयोग मांडण्यात आला होता. या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मानले.