नृत्यांजलीत शास्त्रीय नृत्य कलाकारांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST2021-02-05T06:11:18+5:302021-02-05T06:11:18+5:30

संस्कार भारती देवगिरी प्रांतचे सहमहामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी नटराज प्रतिमापूजन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संस्कार भारती ...

Participation of classical dancers in dance | नृत्यांजलीत शास्त्रीय नृत्य कलाकारांचा सहभाग

नृत्यांजलीत शास्त्रीय नृत्य कलाकारांचा सहभाग

संस्कार भारती देवगिरी प्रांतचे सहमहामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी नटराज प्रतिमापूजन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संस्कार भारती नांदेडच्या नृत्यविद्या प्रमुख दीपाली आवाळे व दीप्ती उबाळे यांनी केली.

डॉ. जयंत शेवतेकर यांनी ‘सादरीकरण व आविष्करण ही कला आहे व ती करत असताना नृत्याचे नियम व आयाम समजून घेतले पाहिजे. भाव, राग, तोल व लय हे नृत्याचा आत्मा आहेत, कलाकार या शब्दाची व्याख्या समजून घेऊन लय, पदन्यास, हस्ताभिनय, मुखाभिनय, आंगिक अभिनय, वाचिक अभिनय या सर्व गोष्टींचा अभ्यासकला सादर करताना असला पाहिजे’, असे सांगितले.

कार्यक्रमात कथ्थक, भरतनाट्यम, ओडिशी अशा विविध नृत्यशैलीतून आपली कला सादर करून सर्वांची मने जिंकली.

सूत्रसंचालन पूजा शिराढोणकर-देशपांडे यांनी केले.

Web Title: Participation of classical dancers in dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.