पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:37+5:302021-05-27T04:19:37+5:30

चौकट ........ शैक्षणिक क्षेत्र ठप्प झाल्याने लाखभर लोक अडचणीत शाळा-महाविद्यालयांबरोबरच विविध प्रवेशाच्या तयारीचे क्लासेसही बंद आहेत. याचा मोठा फटका ...

Parents should not worry about their children's future | पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता करू नये

पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता करू नये

चौकट ........

शैक्षणिक क्षेत्र ठप्प झाल्याने लाखभर लोक अडचणीत

शाळा-महाविद्यालयांबरोबरच विविध प्रवेशाच्या तयारीचे क्लासेसही बंद आहेत. याचा मोठा फटका नांदेडच्या अर्थकारणाला बसला आहे. हे सर्व सुरळीत होते तेव्हा विद्यार्थ्यांची फार गर्दी होते, असे म्हटले जात होते; परंतु जेव्हा शिक्षण व्यवस्था ठप्प झाली तेव्हा यावर विसंबून असलेले सुमारे लाखभर लोक आर्थिक अडचणीत आले. शहरातील सधन लोकांनी यासाठी गुंतवणूक केली होती. ती आज न उद्या भरून निघेल; परंतु जो मध्यमवर्ग विद्यार्थ्यांसाठी खानावळ चालवत होते. छोटे हॉटेल, त्यातील कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आता ही अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचेही आव्हान आहे. त्यासाठी नांदेडकरांना पुढाकार घ्यावा लागेल. बाहेरच्या लोकांना इथे सुरक्षित वाटेल, असे वातावरण तयार करावे लागेल.

Web Title: Parents should not worry about their children's future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.