शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची तिजोरी नाही फुटली म्हणून पानटपरी लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 16:46 IST

तळेगावात पंजाब नॅशनल बँकेत दरोड्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला 

ठळक मुद्देतिजोरी उघडलीच  नसल्याने  चोरट्यांचा बेत फसला बँकेबाहेरील किराणा दुकान व पान टपरी फोडून ४५ हजाराचा ऐवज लंपास 

उमरी ( जि.  नांदेड) : तालुक्यातील तळेगाव येथील पंजाब नॅशनल बँकेवर दरोड्याचा प्रयत्न झाला.  मात्र तिजोरी उघडता आली नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न सलग दुसऱ्यांदा  अयशस्वी  झाला . मात्र, बँके बाहेरील पान टपरी व किराणा दुकान फोडून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांचा ऐवज  लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

ही घटना १७  ऑगस्ट रोजी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घडली. यापूर्वी चार ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला होता. बँकेबाहेरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा  नवीन कॅमेरे बसविण्यात आले.   तळेगाव येथे  गावाबाहेरील जि .प.  शाळेच्या आवारात एका इमारतीमध्ये पंजाब नॅशनल बँकेची शाखा आहे.  रविवारी मध्यरात्रीनंतर  एक ते दीडच्या सुमारास चोरटे बाईकवरून आले.  शाळेच्या गेटवरून चोरटे आवारात घुसले.  बँकेतील १० पैकी ४  सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी  तोडले.  बँकेची वीज पुरवठ्याची मुख्य लाइन तोडून टाकली . गॅस कटरने बँकेचे चॅनल तोडून कुलपे काढली. शटर वर वाकवून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला.  बँकेची तिजोरी मजबूत असल्याकारणाने तिजोरी फोडता आली नाही. 

बँकेतील कपाटे उघडून कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकली तसेच ड्रावर काढून पैशाचा शोध घेतला.  मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. बँक फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी बँके बाहेरील रस्त्यावर असलेल्या बापूराव नाटकर व शेख शरीफ यांच्या पानटपरी व किराणा  दुकानात रोख ६ हजार रुपये व किराणामाल पान टपरीतील  साहित्य चोरून नेले.  सकाळी  शाखा व्यवस्थापक अनुज पोजगे , कॅशियर विजय पंडित तसेच कर्मचारी देवणे आदींनी उमरी पोलिसात माहिती दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.  बाजूच्या एका शेजारील घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दुपारी नांदेडहुन श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. चोरट्यांचा काहीच तपास लागू शकला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीNandedनांदेड