शहरातील गाडीपुरा भागात चोरट्यांनी घर फोडून २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली़ याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला़ ...
तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ...
कृष्णूर येथील मेगा इंडीया अॅग्रो अनाज कंपनी धान्य घोटाळा प्रकरणात नायगाव न्यायालयात ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल केले नाही म्हणून अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा यांनी मागितलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. ...
किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी ते हिमायतनगर या रस्त्याचे केवळ १९ टक्के काम झाले आहे. त्यातच या भागात झालेल्या पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून, दुचाकी घसरुन पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. ...
मुदखेड तालुक्यातील बारड सर्कलमधील जवळा मुरार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्रात शिजवलेल्या मटकीत भोंगे किडे आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़ ...
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत १५ विषयांना मान्यता देताना विद्यमान सभापतीच्या कार्यकाळात न झालेल्या तब्बल १९ सभांच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यात आली आहे. ...
तालुक्यातील बन्नाळी येथील शेतकरी तथा शिवा संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर शंकरराव खपाटे यांना भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकाकडून व कार्यकर्त्यांकडून सोमवारी धक्काबुकी करण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणी दोघांवर गुन्हे दा ...
मुदखेड पोलिसांच्या पथकाने १० जुलैच्या मध्यरात्री १ च्या दरम्यान चोरट्या मार्गाने जाणारी दोन वाहने पकडून २० गोवंशाना जीवदान दिले़ या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून दोघांना अटक झाली़ दोघे फरार झाले़ ...
जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...