शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कल्याणकरांना विरोध पडला महागात; 'डीसीएम'च्या निकटवर्तीयांचे तिकीटच कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:13 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला अति आत्मविश्वास नडला

नांदेड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून चर्चेत असलेल्या गजानन पाटील यांचा अतिविश्वास अखेर त्यांना महागात पडला आहे. त्यांनी आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा केलेला विरोध त्यांच्या अंगलट आला असून, त्यांच्या पत्नी मीनल पाटील यांची उमेदवारी कापली आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी देत आमदारांनी मतदार संघात माझाच शब्द अंतिम हे सिद्ध करून दाखविले.

गजानन पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात 'आपले सरकार' जनकल्याण कक्षाचे प्रमुख होते. त्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली. मात्र, नांदेडच्या राजकारणात ही जवळीक उमेदवारीसाठी अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी मोठा गाजावाजा करत मागील सहा ते आठ महिन्यांपासून सांगवी प्रभागातून तयारी चालविली होते. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण करून आम्ही शिंदे कुटुंबीयांच्या किती जवळचे आहोत, हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु त्यांनी स्थानिक आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्याशी सातत्याने घेतलेली विरोधी भूमिका अखेर त्यांच्या अंगलट आली.

कार्यकर्त्याला दिली संधीशिंदेसेनेकडून नांदेड महापालिका निडणुकीत उमेदवार ठरविण्याचे आणि 'एबी' फॉर्म देण्याचे सर्वाधिकार स्थानिक आमदारांनाच दिले होते. त्याच अधिकारांचा वापर करत कल्याणकर यांनी पाटील यांचा पत्ता कट केला. त्यांनी या प्रभागात आपल्या विश्वासू कार्यकर्त्याला संधी देत, शहरप्रमुख श्याम कोकाटे यांच्या मातोश्री करुणा कोकाटे यांना शिंदेसेनेची उमेदवारी दिली आहे. पाटील यांच्यासाठी आमदार हेमंत पाटील यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, आमदार कल्याणकर यांच्या ठाम विरोधापुढे हे प्रयत्न निष्फळ ठरले.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाShiv Senaशिवसेना