शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मतांच्या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 5:57 AM

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांच्या फरकाने धक्कादायक पराभव झाला.

- विशाल सोनटक्केनांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा ४० हजार मतांच्या फरकाने धक्कादायक पराभव झाला. वंचित बहुजन आघाडीने १ लाख ६६ हजारांपर्यंत मारलेली मुसंडी आणि दलितांबरोबरच मुस्लिम आणि धनगर मतांचे काही प्रमाणात झालेले ध्रुवीकरण, मराठा मते भाजपाकडे वळविण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांनी आखलेली रणनिती यशस्वी झाल्याचे दिसते.२०१४ च्या निवडणुकीत देशभरात मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण हे तब्बल ८१ हजारांहून अधिकच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळेच या निवडणुकीतही चव्हाण पुन्हा विजयी होतील, असा कयास बांधला जात होता. मात्र वंचित बहुजन आघाडीने नांदेडमध्ये कमालीचा जोर लावला.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅ. असोसोद्दिन ओवेसी यांच्या पहिल्या सभेला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. येथूनच मतांच्या ध्रुवीकरणास सुरुवात झाली. चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली. तर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे ४० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६ इतकी मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार ९९६ मतांपर्यंत मजल मारली. भिंगे यांच्या याच मतांनी भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्तकेला.महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि इतर महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था नांदेडमध्ये काँग्रेसच्या ताब्यात आहेत. दीड वर्षापूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने अक्षरश: एकतर्फी विजय मिळविला होता. अशा स्थितीत अवघ्या दीड वर्षात खुद्द अशोक चव्हाण यांचाच पराभव होतो, हे काँग्रेसच्या जिव्हारी लागणारे आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दुसऱ्या फळीबद्दल असलेली नाराजीही चव्हाण यांना भोवल्याची उघड चर्चा आता सुरू आहे.>नांदेड होतेभाजपच्या रडारवरदीड वर्षापूर्वी नांदेड महापालिका जिंकायचीच असा निर्धार करुन भाजप निवडणूक रिंगणात उतरली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह निम्मे मंत्रिमंडळ नांदेडमध्ये होते. मात्र त्यानंतरही अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिकेची निवडणूक अक्षरश: एकतर्फी जिंकत भाजपचे वारु रोखण्याचे काम केले होते. हा पराभव प्रदेश भाजपच्याही जिव्हारी लागला होता. तेव्हापासूनच नांदेड भाजपच्या रडारवर होते. नरेंद्र मोदी यांची सभा झाली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदारसंघात तब्बल ४ सभा घेतल्या. दुसरीकडे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हेही नांदेडमध्ये तळ ठोकून होते.