खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:57+5:302021-05-18T04:18:57+5:30
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध टाकण्यात आले आहेत. बाहेर ...

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर !
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध टाकण्यात आले आहेत. बाहेर जिल्ह्यात प्रवासासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. ई-पास तपासण्यासाठी सीमेवर नाकेही लावण्यात आले आहेत. परंतु या सर्वांमधून खासगी ट्रॅव्हल्सचालकांना मात्र सूट मिळत आहे. खासगी ट्रॅव्हल्समध्ये ना मास्क ना सॅनिटायझरचा वापर केला जातो.
नांदेड शहरातून यापूर्वी दीडशेहून अधिक ट्रॅव्हल्स धावत होत्या. परंतु आता कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचालकांनी अनेक मार्गावरील गाड्या बंद केल्या आहेत. मोजक्याच मार्गावर बसेस सुरू आहेत. त्यामुळे ही संख्या ५०वर आली आहे. या गाड्यांमध्ये प्रवासी संख्या किती असावी हेही निश्चित करण्यात आले आहे. परंतु ट्रॅव्हल्सचालकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. ट्रॅव्हल्समध्ये प्रवासीही बिनदिक्तपणे विना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर न करता प्रवास करीत आहेत.
विशेष म्हणजे शहर वाहतूक शाखा किंवा प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही अशा वाहनांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमावलीतून खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना सुट आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
ना मास्क, ना सॅनिटायझर
खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना बाहेरच सॅनिटाइज करण्याची गरज आहे. परंतु अशी कोणतीही व्यवस्था ट्रॅव्हल्सचालकांकडे नाही. त्याचबरोबर प्रवासीही प्रवासादरम्यान मास्क वापरत नसल्याचे दिसून येते. तसेच सॅनिटायझरचाही वापर करण्यात येत नाही.
ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही
शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅव्हल्सचालक नियमांचे पालन करीत आहेत किंवा नाही याची तपासणी करण्याची गरज आहे. परंतु त्यांच्याकडूनही या ट्रॅव्हल्सचालकांकडे दुर्लक्ष करण्यात येते. पहिल्या टप्प्यात काही वाहनांवर कारवाई करण्यात आली होती.
ई-पास कोणाकडेही नाही
सर्वसामान्य नागरिकांना बाहेर जिल्ह्यात प्रवासासाठी ई-पास काढावा लागत आहे. त्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करताना अनेक प्रवाशांजवळ ई-पास नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बिनदिक्कतपणे ते बाहेर जिल्ह्यात जातात.