शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नरेगाच्या ९३ कामावर अवघे ९२२ मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:20 AM

जिल्ह्यात एकेकाळी रोहयो कामात अव्वल राहत दबदबा निर्माण करणारा तालुका म्हणून कंधार तालुका ओळखला जात होता. परंतु नरेगातंर्गत कामे, त्यावरील मजूर संख्या पहाता दबदबा ओसरला की काय? अशी शंका व्यक्त केली जात असून २८ ग्रामपंचायतीतंर्गत ९३ कामावर अवघे अकुशल ९२२ मजूर असल्याचे समोर आले आहे.

कंधार: जिल्ह्यात एकेकाळी रोहयो कामात अव्वल राहत दबदबा निर्माण करणारा तालुका म्हणून कंधार तालुका ओळखला जात होता. परंतु नरेगातंर्गत कामे, त्यावरील मजूर संख्या पहाता दबदबा ओसरला की काय? अशी शंका व्यक्त केली जात असून २८ ग्रामपंचायतीतंर्गत ९३ कामावर अवघे अकुशल ९२२ मजूर असल्याचे समोर आले आहे.रोजगार हमी योजना कार्यान्वित झाल्यानंतर राज्य पातळीवर नांदेड जिल्ह्याने अमंलबजावणीत आपले मोठे योगदान देत आघाडी घेतली होती. त्यात कंधार तालुक्याने जिल्हा स्तरावर आपली स्वतंत्र ओळख अमंलबजावणीत निर्माण केली होती. नरेगाला सुरुवात झाल्यावर प्रारंभी तालुका योग्य वाटचाल करत राहिला. परंतु मजूरीचे कमी दर, अमंलबजावणीत यंत्रणेची उदासीनता तसेच मजूरांना ऊसतोडणी, वीटभट्टी, बांधकामावर मिळणाऱ्या जास्तीच्या अनामत रक्कमा व त्यातून होणारे पाल्याचे शिक्षण, विवाहाची खर्चिक कामे आदीमुळे मजूरानी फिरवलेली पाठ, घरकुल बांधकामासाठी होणारा रेतीचा तुटवडा आदीमुळे कामाची व मजूराची संख्या वाढविण्याचे आव्हान ठरत आहे.१६ मे रोजीच्या अहवालामुळे नरेगाचे चित्र समोर आले आहे.वनविगागाच्या २ कामावर ३७ मजूर आहेत. ग्रामपंचायतीच्या ८७ कामावर सर्वाधिक ८३० मजूर असून सामाजिक वनीकरणाच्या ४ कामावर ५५ असे एकूण ९२२ मजूर कामावर आहेत. कृषी विभागाची कामे नसल्याने काम व मजूराचा आकडा घटला आहे.किनवट तालुक्यात १६४ कामावर २ हजार ९३ मजूर, भोकर ता ८८ कामावर १ हजार ८२१, अधार्पूर ९१ कामावर १ हजार ३६३,लोहा ११५ कामावर १ हजार १५९, उमरी ७१ कामावर १ हजार ४१ मजूर कामावर आहेत. यानंतर कंधार तालुक्यातील कामे व मजूर संख्या आहे. जिल्ह्यात १४ हजार २४ अकुशल मजूर १ हजार १५८ कामावर आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहता आवश्यतेनुसार कामे वाढविण्याची गरज आहे.साधनांचा दुष्काळनरेगा संदर्भात मस्टर तयार करणे कामासह इतर कामे होतात. तेथे कामाकाजासाठी साहित्य व साधनाचा दुष्काळ आहे. नेट सुविधेचा लपंडाव, प्रिंटरची अपूरी सोय, कागदी रिम अल्प सोय असल्याने कामकाज करताना अडचणी येत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडEmployeeकर्मचारी