ऑनलाईन शिक्षण ही कोरोनाची देण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:04+5:302021-02-05T06:09:04+5:30
महात्मा फुले हायस्कूलच्या अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

ऑनलाईन शिक्षण ही कोरोनाची देण
महात्मा फुले हायस्कूलच्या अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा संस्थेचे सचिव डी. पी. सावंत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहन हंबर्डे, संस्थेचे सहसचिव अॅड. उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे, नरेंद्र चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
यावेळी चव्हाण म्हणाले की, ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर आता काळाची गरज झाली आहे. यापासून शिक्षण क्षेत्रही दूर राहू शकत नाही. व्हर्च्युअल बैठका, सभा यासोबतच आता व्हर्च्युअल क्लासेसही तयार होत आहेत. त्यामुळे कोरोनाची देण समजून इष्टापत्तीचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वाढीसाठी करावा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, असेही ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. महात्मा फुलेंच्या मुख्याध्यापिका माया जयस्वाल यांनी महात्मा फुले हायस्कूलमधील विविध उपक्रम, ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांची प्रगती व संस्थेचा सहभाग याविषयी प्रास्ताविकातून माहिती दिली. सूत्रसंचालन डी. बी. नाईक यांनी, तर आभार कोलेवाड यांनी मानले. कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेंदारकर, उपमुख्याध्यापक संजीवकुमार तायडे, पर्यवेक्षिका सुरेखा कदम, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते. नांदेड-कोरोना महामारीमुळे समाजाच्या सर्वच घटकांवर मोठा दुष्पपरिणाम झाला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. वर्गावर्गातून होणारे प्रत्यक्ष शिक्षण बंद पडले आहे. त्यामुळेच डिजिटल शिक्षण हाच आता पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाईन शिक्षण ही कोरोनाची देण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
महात्मा फुले हायस्कूलच्या अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा संस्थेचे सचिव डी. पी. सावंत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहन हंबर्डे, संस्थेचे सहसचिव अॅड. उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे, नरेंद्र चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
यावेळी चव्हाण म्हणाले की, ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर आता काळाची गरज झाली आहे. यापासून शिक्षण क्षेत्रही दूर राहू शकत नाही. व्हर्च्युअल बैठका, सभा यासोबतच आता व्हर्च्युअल क्लासेसही तयार होत आहेत. त्यामुळे कोरोनाची देण समजून इष्टापत्तीचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वाढीसाठी करावा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, असेही ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. महात्मा फुलेंच्या मुख्याध्यापिका माया जयस्वाल यांनी महात्मा फुले हायस्कूलमधील विविध उपक्रम, ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांची प्रगती व संस्थेचा सहभाग याविषयी प्रास्ताविकातून माहिती दिली. सूत्रसंचालन डी. बी. नाईक यांनी, तर कोलेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेंदारकर, उपमुख्याध्यापक संजीवकुमार तायडे, पर्यवेक्षिका सुरेखा कदम, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते.