लोह्यात ट्रकच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:42 IST2018-01-19T18:41:50+5:302018-01-19T18:42:26+5:30
शहरातील स्मशानभूमी नजीक पुलावर लातूरहुन नांदेडकडे भरधाव वेगात जाणा-या मालट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल स्वारास पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

लोह्यात ट्रकच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी
लोहा (नांदेड ) : शहरातील स्मशानभूमी नजीक पुलावर लातूरहुन नांदेडकडे भरधाव वेगात जाणा-या मालट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल स्वारास पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.
नांदेड - लातुर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील स्मशानभूमी नजीक पुलावर आज सकाळी साडेआठ वाजता लातूरहुन नांदेडकडे जाणारा ट्रक (क्र. एम एच 45 -1384) भरधाव वेगात जात होता. यावेळी समोरील मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या ट्रकने समोरील मोटारसायकल (क्र. एम एच 26 डब्ल्यु 3565) ला पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवरील संजय विठ्ठल राठोड (33, रा.कामठा ता. अर्धापूर ) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश बळीराम पवार ( 32, रा.होनातांडा ता.लोहा) हे गंभीर जखमी झाले.
घटनास्थळास पोहेकाँ. बालाजी पाटील भागानगरे, पोहेकाँ. अशोक केंद्रे यांनी घटनास्थळास भेट देवुन पंचनामा केला. या प्रकरणी मृताचे भाऊ राजू राठोड यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्रकचालक कालिदास खंडु सावंत ( रा. कॉटन ब्रिज मुंबई ) यास ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक बि.एम. मोहीते करत आहेत.