शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीचे लाच प्रकरण; अपर पोलिस अधीक्षकांचा एसीबीने घेतला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:25 IST

तपासाची गती वाढली : डीवायएसपी गोल्डे अजूनही तपासाच्या नावाखाली बाहेरच

बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या एक कोटीच्या लाच प्रकरणात एसआयटी प्रमुख असलेल्या अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी जबाब घेतला आहे. तर मुख्य तपास अधिकारी असलेले बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे अजूनही तपासाच्या नावाखाली बाहेरच आहेत. खाडे पाेलिस काेठडीत आहे, तोपर्यंत खाडे बीडला येण्याची शक्यता कमी आहे. खाडे न्यायालयीन कोठडीत गेल्यावरच गोल्डे एसीबीला जबाब देतील, असे सूत्रांकडून समजते.

जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. यात खाडेसह सहायक फौजदार आर. बी. जाधवर, खासगी व्यक्ती कुशल जैनविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. एसीबीने खाडेच्या घराची झडती घेतली असता रोख एक कोटी रुपये, एक किलो सोने आणि पाच किलो चांदी असे घबाड सापडले होते. यात कोणाचा किती वाटा? याचा शोध एसीबी घेत आहे. त्यामुळेच जिजाऊच्या प्रकरणातील एसआयटीचे तपास अधिकारी बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे, पर्यवेक्षण अधिकारी अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचे जबाब घेतले जाणार आहेत. पांडकर यांचा बुधवारी जबाब घेण्यात आला आहे, परंतु गोल्डे हे तपासाच्या नावाखाली बाहेर असल्याचे सांगून पळवाटा काढत आहेत. १ जूनपर्यंत खाडे हा पोलिस कोठडीत आहे. त्याच्यासमोर चौकशी झाल्यावर आपला भांडाफोड होईल, अशी भीती काही अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच ते पळवाटा शोधत आहेत. असाच काहीसा प्रकार हा तपास अधिकाऱ्यांच्या बाबतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता ते कधी हजर होतात आणि एसीबीला काय जबाब देतात? याकडे लक्ष लागले आहे.

एसपींनी वेळ मागितलाएसीबीने २५ मे रोजी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पत्र देऊन तपासकामी उपअधीक्षक गोल्डे यांना कागदपत्रे घेऊन हजर राहण्याबाबत कळविले होते. त्यानंतर २७ मे रोजी दुसरे पत्र देऊन गोल्डे यांना चौकशीला पाठवा, असे सांगितले. परंतु ठाकूर यांनी गोल्डे हे तपासकामी बाहेर असल्याचे सांगत वेळ वाढवून मागितला आहे. विशेष म्हणजे या पत्रात कोणतीही तारीख न देता मोघम वेळ मागितली आहे. आपल्या अधिकाऱ्यांना एक कोटीच्या लाच प्रकरणातून वाचविण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोल्डे यांनी वेळ वाढवून मागितलाएसआयटी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचा जबाब घेतला आहे. उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे यांनाही तपासकामी हजर राहण्याबाबत पोलिस अधीक्षकांना पत्र दिले होते. परंतु त्यांनी गोल्डे हे तपासकामी बाहेर असल्याचे सांगितले असून वेळ वाढवून मागितला आहे. यात तारखेचा उल्लेख नाही.- शंकर शिंदे, उपअधीक्षक, एसीबी बीड

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग